Home » Testy and easy veg biryani recipe in marathi by manisha

Testy and easy veg biryani recipe in marathi by manisha

veg biryani recipe in marathi
Spread the love

आज आम्ही तुम्हाला veg biryani recipe in marathi मध्ये देत आहोत . व्हेज बिर्याणी हि नॉन व्हेज बिर्याणी सारखी ही रुचकर व चविष्ट लागते . जसे तुम्ही चिकन बिर्याणी किंवा मटण बिर्याणी करता त्यासारखीच चविष्ट लागते . बटाटे काजु , फ्लावर, वाटाणा, पनीर यासारखे भाजी एकत्र करून ही व्हेज बिर्याणी बनवतात .

व्हेज बिर्याणी पॉट  म्हणजेच मातीच्या भांड्यात किंवा दम बिर्याणी सारखे सुद्धा बनवतात.  यामध्ये कोथिंबीर पुदिना वापरतात यांनी बिर्याणीला चांगला सुहास  येतो.  व्हेज बिर्याणी ला बासमती चा  वास येणारा तांदूळ वापरतात . veg biryani हि dum biryani सारखे बनवू शकता .

सर्व भाज्या त्यावर बासमती तांदूळ, आणि त्यावर कोथिंबीर पुदिना फ्राईड राईस हे टाकतात . आम्ही दिलेल्या रेसिपी च्या  मदतीने तुम्ही हॉटेल सारखी व्हेज बिर्याणी घरच्या घरी बनवू शकतात . तर चला व्हेज बिर्याणी बनवूयात.

आमच्या खालील दुसऱ्या रेसिपी सुद्धा तुम्ही वाचू शकता .

 1. chicken handi recipe in marathi
 2. fried rice recipe in marathi

vegetable biryani marathi साहित्य

 1. फ्लावर अर्धा कप 
 2. गाजर बारीक केलेला 
 3. एक बटाटा एक बारीक केलेला 
 4. फ्रेंच बीन्स बारीक केलेलीएक कप 
 5.  हिरवा वाटाणा किंवा फ्रोजन असला तरी चालेल एक कप 
 6.  हिरव्या मिरच्या दोन ते तीन ह्या उभा चिरून
 7. १  कांदा बारीक करून घ्या
 8. काळी मिरची चार ते पाच 
 9. जिरा अर्धा लहान चमचा
 10.  हळद पावडर अगदी थोडी 
 11. आले लसणाची पेस्ट एक मोठा चमचा 
 12. गरम मसाला अर्धा चमचा
 13.  मिरची पावडर अर्धा चमचा 
 14. तेल तीन मोठे चमचे
 15.  दही आणि अर्धा कप 
 16. कोथिंबीर बारीक चिरून दोन मोठे चमचे
 17.  पुदिना एक मोठा चमचा बारीक चिरून
 18.  मीठ चवीनुसार
 19.  इलायची एक किंवा दोन

तांदूळ शिजवण्यासाठी साहित्य

 1. एक लहान चमचा तेल
 2.  बासमती तांदूळ तीन ते साडेतीन कप 
 3.  तेजपत्ता एक ते दोन 
 4. मोठी इलायची एक ते दोन 
 5. मीठ चवीनुसार
 6.  लिंबू अर्धा चमचा

दम देण्यासाठी साहित्य

 1. एक मोठा चमचा पुदिना 
 2. एक मोठा चमचा कोथिंबीर
 3. केशर 8ते  ९ दुधात भिजवून घ्या 
 4. एक चमचा  खायचा रंग
 5. एक मोठा चमचा फ्राईड कांडा 
veg biryani recipe in marathi

veg biryani marathi कृती

पहिल्यांदा आपल्या सर्व भाज्या धुवुन घ्या व त्या बारीक चिरून घ्या.  एका कढई  मध्ये किंवा पातेल्यामध्ये तेल ओता .  ते तेल मध्यम आचेवर गरम करत ठेवा.  त्यामध्ये  कांदा टाका,  कांदा बारीक करून त्यामध्ये टाका.  कांदा व्यवस्थीत परतून तांबूस होईपर्यंत परतून घ्या .

त्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि लसुण पेस्ट, एक चमचा इलायची,  अर्धा चमचा जिरा पावडर ही सर्व टाका व पुन्हा परतून घ्या . आता त्याच्याकडे मध्ये बारीक केलेल्या भाज्या जसे बीन्स,  गाजर,  फ्लावर,  वाटाणा,  बटाटा टाका व चार ते पाच मिनिटांसाठी परतून घ्या.

  आता त्यामध्ये थोडे मीठ टाकून शिजविण्यासाठी ठेवा या भाज्या  जास्त शिजवू नका थोडा कच्चा ठेवा . 5ते 6 मिनिटांनी  एक चमचा धनिया पावडर,  एक चमचा गरम गरम मसाला,  थोडी हळद,  लाल मिरची पावडर अर्धा चमचा हे सर्व टाका व पुन्हा मिक्स करून घ्या व एका मिनिटासाठी पुन्हा शिजवण्यासाठी ठेवा .

त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर पुदिना बारीक चिरून टाका व अर्धा कप दही टाका व सर्व पुन्हा एकदा मिसळून घ्या .  एका मिनिटासाठी शिजवण्यासाठी ठेवा.  आता गॅस बंद करा व कढईवर झाकण ठेवून द्या. 

 

 

तांदूळशिजवण्याची प्रक्रिया

एक मोठे भांडे घ्या त्यामध्ये पाच ते सहा मोठी कप पाणी घेऊन गरम करण्यासाठी ठेवा.  एक लहान भांड्यात तांदूळ घ्या व ती धुऊन त्यानंतर 15 ते 20 मिनिटांसाठी तांदूळ भिजत ठेवा . पातेले गरम करण्याआधी तांदूळ भिजवलेले आवश्यक आहे .

पंधरा मिनिटं नंतर त्यातील पाणी काढून घ्या.या मोठ्या भांड्यात आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते.  त्यामध्ये एक मोठी विलायची लवंग,  दोन ते चार पत्ता,  दालचिनी हे टाका व थोडेसे तेल टाका व लिंबाचा रस टाका जेणेकरून त्या चिकटणार नाही .

लिंबाचा रसामुळे तांदूळ  पांढराशुभ्र राहील.  हे सदर सर्व पदार्थ टाकल्यानंतर त्यामध्ये तांदूळ टाका व 80 टक्के पर्यंत शिजवुन घ्या . सात ते आठ मिनिटानंतर 80 टक्केपर्यंत तांदूळ शिजते .  त्यानंतर चाळणीच्या साह्याने काढून घ्या व एका प्लेटमध्ये काढावे.

बिर्याणी बनवण्याची क्रिया

आपण ज्या कढई  मध्ये ग्रेवी शिजवलेली होती म्हणजे सर्व भाज्या शिजल्या होत्या त्या पुन्हा गॅस  वरती गरम करण्यासाठी ठेवा व गॅस चालू करा. कढई मधील ग्रेवार ८० % शिजलेला तांदूळ पसारा .  तांदूळ व्यवस्थित सर्वत्र पसरून घ्या त्यावर फ्राईड  कांदा,  पुदिना,  कोथिंबीर टाका व केसर दुधामध्ये  टाका व थोडेसे तूप सुद्धा टाका आणि  खायचा रंग त्यावर पसरून द्या .

आता हे सर्व शिजण्यासाठी ठेवा . एका कढई वर झाकण कणिक च्या साह्याने सीलबंद करून घ्या . झाकण बंद करण्यासाठी गव्हाचे पीठ मळून घ्या व कडेवरती ते चिटकून घ्या आणि त्यावर ती हे चाकण व्यवस्थित घट्ट करून घ्या.  १० मिनिटे  गॅस मध्यम आचेवर ती चालू ठेवा व  दहा मिनिटानंतर आपली बिर्याणी तयार होईल . 

अशा प्रकारे veg biryani तयार झाली आहे . 

तुम्हाला आमची हि veg biryani recipe in marathi  रेसिपी आवडल्यास शेअर करा व खालील कंमेंट बॉक्स  मध्ये  कंमेंट  करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *