Best Varsha Ritu Nibandh In Marathi 2023 | वर्षा ऋतू निबंध

आज आपण varsha ritu nibandh in marathi |वर्षा ऋतू निबंध बद्दल लिहणार आहोत .

वर्षा ऋतू निबंध हमखास परीक्षेमध्ये विचारला जातो तर आज आपण वर्षा ऋतू निबंध लिहणार आहोत . वर्षा ऋतू निबंध तुमि ह्या च्या द्वारे आरामशीर लिहू शकता .

Varsha Ritu Essay In Marathi |

varsha ritu nibandh in marathi | वर्षा ऋतू निबंध 

वर्ष ऋतू – उन्हाळ्याच्या तापदायक दिवसानंतर व तीन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे किंवा वर्ष ऋतूचे आगमन होते . वर्ष ऋतू हा आल्हादायक व सर्वाना हवा हवासा ऋतू आहे . 

उन्हाळ्यामध्ये जो सर्वाना उन्हाचा त्रास होतो त्यामुळे सर्वजण ह्या ऋतू ची चातकाप्रमाणे वाट पाहत असतात .

पक्षी ,प्राणी , माणसे, शेतकरी , पर्यटक , असे सर्वजण पावसाची वाट पाहत असतात . आपल्या देशामध्ये पावसाळा हा जुलै महिन्यामध्ये येतो . जुलै ते सप्टेंबर महिन्यापर्येंत हा ऋतू असतो . 

वर्ष ऋतू म्हणजे सगळीकडे हिरवेगार , सर्वत्र पाणी , नद्या नाले तलाव तुडुंब भरलेले . सर्वत्र असे मनमोहक वातावरण असते .

गड, किल्ले , डोंगर हिरवेगार झालेले असतात ते डोळ्यांना दिलासा देणारे दृश्य असते .

वर्ष ऋतू  मुळे पाऊस पडतो , शेतीसाठी पाणी मिळते . पशु पक्षी याना सुद्धा पिण्यासाठी पाणी मिळते उन्हाळ्यामुळे वनात रानात पाणथळ आटतात .

पण वर्ष ऋतू आल्यामुळे ते तुडुंब भारतात . गावाकडे दुष्काळामुळे पाणी टंचाई झाली असते ती दूर होते व सर्वाना पाणी मिळते . 

पावसाळ्यामध्ये मोर हा पक्षी पिसारा फुलवून नाचतो त्याचा नाच हा बघण्यासारखा असतो . आकाशामध्ये दिसणारा इंद्रधनुष्य बघण्यासारखा असतो . ह्या सर्व कारणामुळे वर्षा ऋतू सर्वाना आवडतो . 

वर्ष ऋतू मध्ये पर्यटकांना मेजवानी ठरते या काळात सर्व पर्यटक बाहेर फिरायला जातात .

गड किल्ले , जंगले हरवेगार झालेली असतात धुके जमा झालेले असते त्यामुळे बाहेर फिरायला खूप आनंदायी वाटते .

वर्षा काळ जसा चांगला आहे तसा त्याचे तोटे पण आहेत जसे रोगराई वाढणे , पूर येणे , वीज पडणे , मातीची धूप होणे असे अनेक प्रकारच्या हानी होतात .

वर्षा ऋतू मध्ये रोगराई भयंकर वाढते . मलेरिया , टायफॉईड असे जीव घेणे रोग वाढतात . सर्दी खोकला , ताप येणे , साथीच्या रोगांचे प्रमाण वाढणे असे प्रकार पावसाळ्यामध्ये किंवा वर्षा ऋतू मध्ये होते . 

पावसाळ्यामध्ये वीज जाणे असे प्रकार होतात , खेडे गावात तर  ३ ते ४ दिवस वीज पावसाळ्यामध्ये जाते .

कधी तर वीज अंगावरती पाडण्याचे प्रकार होतात त्यामुळे पशु व माणसांचे मृत्यू देखील होतात 

वर्षा ऋतू मध्ये पूर येतात त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते , वनामध्ये प्राणी मूतृमुखी पडतात .

झाडे पडतात ,जमिनीची धूप होते असे प्रकार पावसाळ्यामध्ये होतात त्यामुळे वर्षा ऋतू जसा फायदेशीर आहे तसा हानिकारक सुद्धा आहे . 

असा हा वर्षा ऋतू सर्वांचा आवडता ऋतू असतो . 

Leave a Comment