Home » Fast vada pav recipe in marathi in 2021

Fast vada pav recipe in marathi in 2021

Spread the love

Vada pav Recipe in Marathi

नमस्कार मित्रांनो वडापाव कसा बनवायचा याची कृती पाहणार आहोत सर्वांना आवडणारा पदार्थ आहे .स्वातंत्र्य काळानंतर वडापावला महाराष्ट्रात खूप प्रसिद्धी मिळाली .

गरीब असो श्रीमंत असो हा सर्वांना आवडणारा पदार्थ आहे आणि तो झटपट हि बनतो. आज जागोजागी नाक्यावर गल्लीबोळात वडापावची गाडी मिळते आणि तिथे जमलेली गर्दी याची प्रसिद्धी दर्शवते .आज आपण पाहणार आहोत की वडापाव कसा बनवतात .

तुम्ही युट्युब वर किंवा व्हिडिओ पाहिले असतील आणि अन्य ठिकाणी ज्यामध्ये वडापाव कसा बनवायचा याची कृती दर्शवलेले आहे .

परंतु तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये आम्ही सविस्तर माहिती देणारा  आहोत की Vada pav recipe in marathi language  त्याच्यानंतर तुम्ही आरामशीर वडापाव बनवू शकता 

वडापाव ला लागणारी पदार्थ | Vada Pav Ingredient

 एक किलो बटाटे,

लादी पाव,

 तीन ते चार हिरव्या मिरच्या ,

कोथिंबीर, कढीपत्ता, 

मोहरी , आले  लसुन,

 3 ते 4 चमचे तेल, 

तीन ते चार कप बेसन पीठ ,

अर्धा चमचा

 खायचा सोडा

 मीठ चवीनुसार

 अर्धा चमचा साखर ,

दोन चम्मच  तांदळाचे पीठ .

पाणी गरजेनुसार 

जर तुम्हाला मोमोज कसे बनवायचे किंवा momos recipe in marathi पाहायचे असल्यास ह्या लिंक वर क्लिक करा

वडापाव बनवायची कृती

सात ते आठ वडा बनवायला तुम्हाला पाऊण तासाचा वेळ लागू शकतो .

 1. सगळ्यात पहिल्यांदा एक भांडे घेऊन त्यामध्ये बेसन पीठ घ्यावे व ते चांगले भाजून घ्यावे .मंद आचेवर दोन ते तीन मिनिटे भाजल्यानंतर  ते  दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावे.   मंद आचेवर वरती बेसन पीठ  भाजल्याने वडापाव चांगला लागतो  त्याला चव येते.
 2. आले व तीन  ते चार लसणाची पाकळी घ्यावे व त्याची चांगली पेस्ट करावी .
 3. एक मोठी भांडी घ्यावी व त्यामध्ये तांदळाचे पीठ मीठ ओवा व थंड केलेले बेसन पीठ घ्या   गरम केलेले तेल टाकावे व हे मिथुन करून घ्यावी
 4. आता बेसन चे पिठात थोडे पाणी टाकावे  पिठात थोडे थोडे पाणी घालावे त्याचा घोळ  बनवून घ्यावा तो जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नसावा बनवावा तो व्यवस्थित दहा ते बारा वेळा फेटुन घ्यावा हळद , सोडा , मीठ हे सुद्धा ह्या मिश्रणामध्ये घालावे . 
 5. बटाटे शिजून झाल्यावर ते सोलून घावे . नंतर ते बारीक वाटून  घावे किंवा किसणीने बारीक करून वाटून घावे . 
 6. आले , लसूण जिरे , हिरव्या मिरच्या हे सर्व माध्यम बारीक करून घ्यावे . 
 7. तेल गरम करून घ्यावे त्यामध्ये हिंग, जिरे , आलेपेस्ट ,हळद , मोहरी , कडीपत्ता ,मीठ चवीनुसार  , हळद , कुस्करलेला बटाटा , हे सर्व मंद आचेवरती चांगले परतून घावे व एकजीव करावे . एकजीव केलेल्या भाजीचे चपटे गोळे तयार करावेत . 
 8. जे बेसन पीठ चा घोळ  केला आहे त्यामध्ये भाजीचे छोटे गोळे चपटे करून बुडवून घावे . 
 9. कढई मध्ये तेल गरम करावे तेल चांगले गरम झाल्यावरती त्यामध्ये हे चपटे गोळे ४ ते पाच सोडावे व लाल सर होई पर्यंत तळावे. 
 10. हे तळलेले गोळे खाण्यासाठी पावाबरोबर द्यावे .

 

vada pav chutney recipe in marathi

वडापावची कोरडी चटणी 

हि चटणी बनवण्यासाठी तुम्हाला खालील साहित्य लागते 

१. सोललेला लसूणच्या ३ ते ४ पाकळ्या 

२. नारळाचा किस 

३. तांबडं तिखट 

वरील तीन गोष्टी कोरडी चटणी बनवण्यासाठी लागते . आता आपण वडापावची कोरडी चटणी बनवण्याची कृती पाहूया .

१. कढई मध्ये तेल टाका .ते माध्यम आचेवर गरम करून घ्या 

२.ज्या लसूण पाकळ्या घातल्या आहेत त्या २ तीन मिनिटे तळा. तपकिरी रंग आल्यावर बाहेर काढा .

३. ओला किसलेला नारळ कढई मध्ये तपकिरी रंगाचा होई पर्यंत भाजून घ्या . 

४.आता सर्व एकत्र करा लसूण पाकळ्या , तिखट , भाजलेले खोबरे एकत्र करा व वडापाव सोबत खायला घ्या . 

This is vada pav chutney recipe in marathi if you like then share it . 

how to make vada pav in marathi and Tips

 1. टीप : बेसन भाजल्याने त्याची चव खुलते आणि पदार्थ खुसखुशीत होतो.
 2. बेसन थंड झाले की एका मोठ्या भांड्यात घेऊन त्यात तांदळाचं पीठ , ओवा, हळद, १ टीस्पून मीठ घालून एकत्र करून घ्यावे. त्यात १ टेबलस्पून कडकडीत गरम तेल घालून मिसळावे .
 3. टीप: गरम तेलाचे मोहन घातल्याने वड्याचे आवरण कुरकुरीत बनते .
 4. एकदम पाणी न घालता थोडे थोडे पाणी घालून बेसनाचा घोळ बनवून घ्यावा . जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावा. चमच्यावर पातळ थर बसेल इतक आवरण सरसरीत असावे, त्यासाठी मी १ कप पाणी वापरले आहे . हे बेसनाचे मिश्रण चांगले ७-८ मिनिटे फेटून घ्यावे. मग ते किमान १५ मिनिटांसाठी झाकून ठेवावे .
 5. बटाटे सोलून त्यांना किसणीने किसून घ्यावेत . असे केल्याने बटाटे एकसारखे किसले जातात व त्यातील जर टणक भाग राहिला असेल तर तो बाजूला काढून टाकता येतो. यामुळे बटाटेवड्यांना एक स्मूथ टेक्सचर येते .
 6. मिक्सरमधून हिरव्या मिरच्या, लसूण ,आले आणि जिरे पाणी न घालता जाडसर वाटून घ्यावे.
 7. बटाटेवड्यांचे सारण बनवण्यासाठी एका कढईत दीड टेबलस्पून तेल तापवून त्यात मोहरी, मेथी , कढीपत्ता , हिंग यांची फोडणी देऊन १-२ मिनिटे परतून घ्यावे. त्यात हिरवा मसाला घालून त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यावा.
 8. आता हळद व थोडी चिरलेली कोथिंबीर घालून १-२ मिनिटे तेलात परतावी.
 9. किसलेले बटाटे , साखर आणि चवीपुरते मीठ घालून नीट एकत्र करून घ्यावे .
 10. हे मिश्रण २-३ मिनिटे परतावे. आता लिंबाचा रस , उरलेली कोथिंबीर घालून ढवळून गॅस बंद करावा. हे सारण थंड होऊ द्यावे.
 11. बटाट्याच्या सारणाचे आपल्याला हव्या त्या आकाराचे गोळे बनवून चपटे वडे थापून घ्यावेत.
 12. वडे तळण्यासाठी कढईत तेल मध्यम आचेवर चांगले तापवून घ्यावे. तेल तापले की पहिल्यांदा त्यात चमच्याने बेसनाचा घोळ बुंदीच्या आकाराएवढा पसरवून चुरा तळून घ्यावा . हा चुरा आपण पावातही घालणार आहोत व चटणी बनवतानाही वापरणार आहोत. सोनेरी रंगावर चुरा तळून घ्यावा .
 13. बटाटेवडे बेसनाच्या घोळात नीट बुडवून कढईच्या कडेने अलगद तेलात सोडावेत . मंद ते मध्यम आचेवर २-३ मिनिटे दोन्ही बाजूंनी खरपूस तळावेत.
 14. वडापावच्या चटणीसाठी एका मिक्सरच्या भांड्यात , दीड टीस्पून काश्मिरी मिरची पूड, ५-६ लसणीच्या पाकळ्या , थोडे मीठ आणि पाऊण कप तळलेला चुरा घालून पाणी न घालता जाडसर वाटून घ्यावी.
 15. वडापाव खायला देताना पाव सुरीने मध्यभागी कापावे , त्यावर हिरवी चटणी, चिंचेची चटणी , वडापाव चटणी लावून पावात चुरा घालावा . वडा घालून आपला वडापाव तयार ! सोबत तळलेली हिरवी मिरची द्यायला विसरू नये !
 16. this is the Vada Pav Recipe in marathi language. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *