vachal tar vachal marathi nibandh for student |

Spread the love

आज आपण वाचाल तर वाचाल निबंध पाहणार आहोत . आम्ही लिहलेल्या vachal tar vachal marathi nibandh  च्या साह्याने तुम्ही सहजपणे एक सुंदर नवीन निबंध लिहू शकाल . हा निबंध तुम्हाला शाळेमध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये विचारतात  . तर चला निबंध लिहुयात . 

vachal tar vachal essay in marathi language

वाचल तर वाचल म्हणजे तुम्ही पुस्तके वर्तमानपत्र साहित्य काही वाचाल तर आयुष्य एकदम आनंदात व सोपे होते.  तुम्हाला बऱ्याच अडचणी नाहीशा होतील आणि माणसाच्या ज्ञानामध्ये भर पडते , त्याची बुद्धिमत्ता व  निर्णय घेण्याची क्षमता या गोष्टी वाढतात .

अज्ञान दूर होते म्हणजेच जुनीजाणती म्हणतात वाचाल तर वाचाल . वाचनाचे महत्त्व खूप आहे जे थोर लोक झाले आहेत त्यांनी त्यांचे जीवन वाचनामुळे घडवले . त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वाचनाची आवड ठेवली होती ते सतत वाचन करायची . 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी हे सर्व महान पुरुष आपल्या जीवनामध्ये वाचनाची संधी सोडत नसत . 

आजच्या काळात श्रीमंत किंवा यशस्वी व्यक्तींची आत्मचरित्र जरी पाहिली तरी तुम्हाला कळेल की त्यांनी वाचला खूप महत्त्व दिले आहे. थोर गुंतवणूकदार रोज दोन तास पुस्तके वाचतात .

बिल गेट्स हीसुद्धा रोज पुस्तके वाचतात ते थोर व्यक्ती होऊन गेले आहेत किंवा आहेत त्यांचे आयुष्य पाहता त्यांनी अनेक पुस्तके वाचलेली आहेत.  वाचनाची खूप महत्त्व आहे म्हणूनच शासनाने प्रत्येक गावात ग्रंथालय उघडले आहेत. 

शाळेत सुद्धा आपण पाहतो की ग्रंथालय असतात त्यामध्ये  भरपूर पुस्तके ठेवलेली असतात.  शाळेतील शिक्षकांचा हाच हेतू असतो की मुलांनी जास्तीत जास्त वाचन करावे . आपले मन किंवा आपल्याला चांगले विचार हे वाचनामुळे निर्माण होतात . आपले विचार हे सकारात्मक होता तसेच मनामधील नकारात्मक विचार निघून जातात . 

vachal tar vachal marathi nibandh

वाचनाची गोडी लागल्याने आपल्याला दुर्विचारमनात येत  नाहीत . आपल्याला नेहमी चांगले विचार करतो आणि विचार करण्याची माणसाची क्षमता वाढते . आपले ज्ञान हे सुद्धा खूप प्रमाणात वाढते व आपले अज्ञान दूर होते .

आपल्याला जर वाचण्याची आवड असेल तर आपण कोणत्याही परीक्षा पासून दूर पळून जात नाही व परीक्षा  आपल्याला अवघड जात नाहीत.  शाळेमधील परीक्षा आपण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतो .

आपण ज्या शाळेत शिकतो त्यापासून आपल्याला पुस्तकी ज्ञान मिळते पण जर आपण वाचनाची आवड ठेवली असेल तर आपण दुसऱ्या पुस्तकांमधून चांगल्या गोष्टी शिकू शकतो तसेच ज्ञान मिळू शकतो . 

आपला शब्दसंग्रह सुद्धा चांगला होतो त्यांनी आपण वेगवेगळे लेख, कविता गोष्टी लिहू  शकतो . आज इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे माहिती खूप मोठ्या प्रमाणात मिळत आहे हि माहिती ग्रहण  करण्याची आपली क्षमता हवी. स्पर्धेच्या युगात तुम्हाला जगाच्या बरोबरीने चालले पाहिजे . नवीन गोष्टी शिकल्या व आत्मसात केल्या पाहिजेत . 

जर तुम्ही वाचत  असेल तर तुम्ही नवीन गोष्टी शिकू शकता व पुढे जाण्यास मदत होते .  शाळेत आपण जातो तिथे शाळेतली पुस्तके असतात , ग्रंथालय मधील सुद्धा पुस्तके वाचावी.  घरी पेपर वाचवा जेणेकरून आपल्या ज्ञान मधील फरक पडेल व  आपल्या सभोवतालची  घटना घडतात त्याची माहिती आपल्याला मिळेल .

आजकाल मोबाईल मुळे मुले मोबाईल मध्ये पहात बसतात, गेम्स किंवा दुसऱ्या गोष्टी पाहत असतात परंतु त्या मधील नवीन पुस्तके पाहत नाहीत किंवा नवीन लेख असतील किंवा नवीन प्रकाशित होणारे पुस्तके वाचत नाही. 

मोबाईल टीव्ही त्यामुळे  आत्ताच्या पिढीची खूप नुकसान होत आहे आणि आपली पिढी सुसंस्कृत होत नाही अशा वेळी आपल्या पिढीला सुसंस्कृत व चांगल्या सवयींची बनवू शकते . भगवद्गीता अशा प्रकारची  धार्मिक पुस्तके मुलांना अध्यात्मिक बनवतात . 

त्यांच्यावर चांगले संस्कार होण्यास मदत करतात.  आत्मचरित्र यशस्वी कसे व्हायचे कठीण प्रसंग कठीण प्रसंगाला तोंड कसे द्यायचे याचे अनुभव देतात , वाचन  मुले ज्ञानाची कवाडे खुली होतात.  त्यामुळे तुमची चरित्र व्यवस्थित होते व  तुम्हाला यशस्वी होण्यास मदत होते. 

 

तुम्हाला हा वाचाल तर वाचाल निबंध | vachal tar vachal marathi nibandh  जर आवडला असेल तर तुम्ही तुमच्या वर्ग मित्रांना सांगा व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा .

तुम्ही आमचे दुसरे निबंध सुद्धा वाचू शकता जे खाली दिलेले आहेत .

  1. plastic bandi  in marathi essay .
  2. my best friend essay in marathi
  3. essay on kabaddi

for more essay in marathi go to – world of marathi

Leave a Comment