Home » Ukdiche modak recipe in marathi by manisha

Ukdiche modak recipe in marathi by manisha

Spread the love

उकडीचे मोदक म्हटले की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते . आज आपण तुम्हाला ukdiche modak recipe in marathi मध्ये देत आहोत. उकडीचे मोदक गणेश चतुर्थीला करतात.  मोदक हे स्वादिष्ट व चवदार असतात. 

त्यामुळे सर्वांना आवडतात अगदी लहानांपासून थोरांपर्यंत उकडीचे मोदक आवडतात . उकडीच्या मोदका ची रेसिपी ही खूप सोपे आहे.  मोदक खूप कमी वेळात बनतात ,आम्ही जे तुम्हाला रेसिपी देणार आहोत त्याच्या मदतीने तुम्ही सहजपणे उकडीचे मोदक करू शकता. 

आम्ही खाली दिलेल्या रेसिपी सुद्धा तुम्ही वाचू शकता .

 1. Dal tadka recipe in marathi
 2. anarse recipe in marathi
 3. tomato soup recipe in marathi

साहित्य

दिड कप गूळ 

बारीक केलेला तांदळाचे पीठ दोन कप

 नारळाचा किस दोन कप

 काजू 1 मोठा चमचा बारीक तुकडे केलेली

 खसखस एक मोठा चमचा

 मीठ चवीनुसार

 इलायची चार ते पाच बारीक करून घ्या

 तेल आवश्यकतेनुसारukdiche modak recipe in marathi

कृती

 1. एक भांडे घ्यावे त्यामध्ये पाणी गरम करण्यात यावी या पाण्यामध्ये तूप किंवा तेल मिसळावी . पाणी गरम करण्यासाठी तीन ते चार कप  घ्यावी आणि गरम झाल्यावर पाणी उकळावे थांबावे. 
 2. एका प्लेटमध्ये तांदळाचे पीठ घ्यावी,  एका प्लेटमध्ये  तांदूळ पीठ  घेतल्यावर त्यामध्ये  हे गरम पाणी थंड करून थोडे थोडे मिसळत जावे व तांदळाचे पीठ मळावे . तांदळाचे पीठ मळून त्याची कणिक  बनवावी व ती दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवावी . 
 3.  आता एक कढई  घ्या त्यामध्ये तेल किंवा तूप टाकून गरम करा.  त्यामध्ये कच्चा  किसलेला नारळ हा भाजून घ्यावा . भाजलेल्या नारळाच्या किसमधे गूळ टाका. गूळ हा चांगला बारीक करून टाका व त्या नारळाच्या किस मध्ये मिसळा .
 4. या वरील मिश्रणात खसखस,  जायफळ,  इलायची पावडर टाका व व्यवस्थित हलवून एकत्र करा हे करत असताना गॅस मध्यम आचेवर ठेवा. 
 5.  आता एका प्लेटमध्ये मळलेले पीठ म्हणजेच कणिक  घ्या व त्याला पुन्हा तेल लावून मळा.  आता तुम्ही मोदक करण्यासाठी साच्या सुद्धा उपयोगात आणू शकता किंवा हाताने सुद्धा करू शकता.  आपण हाताचे मोदक तयार करू .
 6. तांदळाचे मळलेले पीठ घ्या व ती हातावरती ठेवा हातावरती पीठ लांब करा त्यामध्ये वर तयार केलेले मिश्रण नारळाचा कीस व गूळ याचे मिश्रण ठेवा व कणकेचे पिठ म्हणजेच पिठाची तोंड झाकून घ्या . दहा ते बारा मोदक तयार करा.  
 7. आता एक कुकर घ्या त्यामध्ये थोडे पाणी टाका व त्यावरती लोखंडी स्टील ची चाळून ठेवा . जर स्टीमर असेल तर अति उत्तम .
 8. कुकरमध्ये एक चपट्या  भांड्यात मोदक ठेवा व खाली चाळण  ठेवा दोन ते तीन कप पाणी खाली होता व कुकर लावा . सात ते आठ मिनिटांनी आपले मोदक तयार होतील . ज्या भांड्यात मोदक ठेवणार आहात त्याला तेल  लावा जेणेकरून मोदक चिकटणार  नाहीत. 

अशा तऱ्हेने आपली मोदक  तयार होतील नमस्कार धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हि Ukdiche modak recipe in marathi रेसिपी आवडल्यास तुम्ही शेअर करा व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *