Home » Testy & easy tomato soup recipe marathi by manisha

Testy & easy tomato soup recipe marathi by manisha

tomato soup recipe in marathi
Spread the love

नमस्कार मित्रांनो आज आपण आज आपण टोमॅटोचे सूप कशी करायची हे किंवा tomato soup recipe in marathi  पाहणार आहोत. टोमॅटोचे सूप म्हटले की आपल्याला चायनीज  आठवते . फास्ट फूड मुळे आजकाल सूप खूप प्रसिद्ध झाले आहे .

आरोग्यासाठी हे सूप  अतिशय योग्य आहे .बाजारात सहजरीत्या हे सूप  मिळते .पण आज आपण घरच्या घरी हे सूप  कशी बनवतात ते पाहणार आहोत . थंडीच्या दिवसात  सूप खाल्याने आरोग्य उत्तम राहते .रक्तामधील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी टोमॅटोचे सूप चांगले असते .

टोमॅटोचे सूप मध्ये अनेक मसाला मिसळलेले असतात त्याने त्याची चव वाढते . 15 ते 20 मिनिटांमध्ये सूप बनवून तयार होते हे सूप बनवायला खूप कमी वेळ लागतो .गरम गरम असतानाच हे सूप प्यायला  चांगले व चविष्ट लागते.

त्यामुळे बनवल्यानंतर लगेचच सूप प्यायला घ्या. तर चला  घरच्या घरी होम मेड टोमॅटो सूप बनवूया.

साहित्य

 •  चार ते पाच मोठे  टोमॅटो 
 • काळी मिर्च सात ते आठ
 •  लसणाच्या पाकळ्या चार ते पाच
 •  बटर अर्धा मोठा तुमचा
 •  तेजपत्ता एक
 •  साखर अर्धा मोठा चमचा
 •  मैदा किंवा कॉर्न फ्लॉवर सुद्धा चालेल तो अर्धा लहान चमचा घ्या . 
 •  मीठ चवीनुसार
 •  पाणी दीड कप

जर तुम्हाला आमच्या दुसऱ्या रेसिपी वाचायच्या असल्यास खालील पोस्ट वाचा .

 1. kobichi bhaji recipe in marathi
 2. sambar masala recipe in marathi
 3. samosa recipe in marathi
tomato soup recipe in marathi

कृती

 1. एका भांड्यात टोमॅटोची तुकडे करून घ्या टोमॅटोची लहान लहान तुकडे केल्यानंतर  ते एका भांड्यामध्ये ठेवा .या भांड्यात टोमॅटोचे तुकडे, काळी मिरची, लसूण पेस्ट, तेजपत्ता टाका व हे भांडे गॅस वरती शिजवण्यासाठी ठेवा.
 2. या भांड्यात एक पाणी ओता व कुकर दहा आठ ते दहा मिनिटांसाठी  मध्यम आचेवर ती गॅसवर ठेवा . टोमॅटो एकदम नरम  होईपर्यंत शिजवा .कूकरच्या दोन शिट्या पर्यंत होईपर्यंत कुकर गॅसवर ठेवावा.  दहा मिनिटानंतर गॅस बंद करा . 
 3. टोमॅटो नरम झाले असेल तर भांडे काढून घ्या व थंड होण्यासाठी ठेवा.  हे मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्यामधील तेजपत्ता काढून घ्या व मिक्सर मध्ये टोमॅटो व  बाकीची        पदार्थ पूर्णपणे बारीक करून घ्या हे सर्व मिश्रण पूर्णपणे बारीक झाल्यावर  मिश्रण गाळणीच्या  साह्याने गाळून  घ्या.
 4. गाळण ही लहान किंवा एकदम बारीक नसावी .  जेणेकरून जास्त बारीक न निघता टोमॅटोचा मोटा रस निघेल. टोमॅटोच्या रसासोबत थोडे पल्प सुद्धा पडतील अशा हिशोबाने चाळून घ्या.
 5.  एक तवा घ्या मध्यम आचेवर तो  गॅस वरती  तो गरम करण्यासाठी ठेवा . तवा गरम झाल्यावर त्यावर अर्धा चमचा बटर टाका .बटर वितळल्यावर त्यामध्ये मैदा टाका मैदा एक मिनिटासाठी या बटरमध्ये शिजवा आता थोडे थोडे टोमॅटोची मिश्रण यामध्ये टाका व हलवावे जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाहीत .
 6. आता या मिश्रणामध्ये  अर्धा कप पाणी टाका व पुन्हा सर्व मिक्स करा .
 7.  गॅस मोठा ठेवावा थोड्यावेळाने गॅस मध्यम आचेवर ठेवा चार ते पाच मिनिटे पर्यंत गॅसवर हे सूप शिजण्यासाठी ठेवा . असे आपले टोमॅटोचे सूप तयार होईल. तुम्ही टोमॅटोची सूप  चाखून बघा जर तुम्हाला मिठाची कमतरता वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये मीठ टाकू शकता.

 

Tips

 टिप्स

 1. टोमॅटोचे सूप तयार करताना कच्चे टोमॅटो घेऊ नयेत शक्यतो पिकलेले टोमॅटो घ्यावी
 2.  तुम्ही टोमॅटो सूप मध्ये साखर टाकताना काळजी घ्या साखर टाकताना सूप  ची टेस्ट  घ्या ,साखरेची आवश्यकता वाटली तरच जास्त साखर टाका.
 3. टोमॅटो सूप मध्ये गाजर सुद्धा वापर करू शकता गाजरामुळे तेच उप ची टेस्ट चांगली होते 

जर तुम्हाला हि tomato soup recipe in marathi आवडली असल्यास तुम्ही हि शेअर करा व खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *