Home » Easy and testy pav bhaji recipe in marathi by manisha

Easy and testy pav bhaji recipe in marathi by manisha

pav bhaji recipe in marathi-
Spread the love

पावभाजी देशातील एक प्रसिद्ध डिश आहे . पार्टी असो व लग्न सोहळा त्यामध्ये बनणारी हि डिश आहे . कोणत्याहि  हॉटेलमध्ये सहज रित्या उपलब्ध होणारी हि  डिश आहे. आज आम्ही तुम्हाला pav bhaji recipe in marathi मध्ये देणार आहोत.

त्याच्यासोबत झटपट pav bhaji restaurant style recipe in marathi मध्ये कशी बनवावी हे सुद्धा सांगणार आहोत. पावभाजी ही सर्व भाज्यांची मिळून बनवलेली भाजी असते त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या वापरतात त्यामुळे त्याला चांगली चव येते.

हि  भाजी अनेक प्रकारच्या  भाजी पासून बनवले असल्याने ती पोषक सुद्धा असते.  घरी तुम्हीही पावभाजी आरामशीरपणे अगदी सहजरीत्या हॉटेल सारखे बनवू शकता.  तर चला पाव भाजी बनवूयात .

पाव भाजी बनवण्यासाठी लागणारा वेळ 15 ते 20 मिनिटे व तयारीसाठी लागणारा वेळ  पंचवीस ते तीस मिनिटे व खाली दिलेल्या साहित्यानुसार तीन जणांसाठी पाव भाजी बनवू शकता.

आमच्या खालील रेसिपी सुद्धा तुम्ही वाचू शकता .

 1. dahi vada recipe in marathi
 2. chakali recipe in marathi
 3. samosa recipe in marathi 

साहित्य

 1.  हिरवा वाटाणा जर हिरवा वाटाणा नसेल तर फ्रोझन सुद्धा चालेल हा दिड कप घ्या
 2.  बटाटे बारीक करून दोन घ्या 
 3. बीन्स दोन मोठे चमचे बारीक तुकडे करून 
 4.  गाजर दीड कप बारीक केलेली
 5.  फ्लॉवर अर्धा कप
 6.  मोठा कांदा एक घ्या जवळजवळ3/4 काप  असला तरी चालेल
 7.  टोमॅटो दोन मोठे घ्या बारीक करून
 8.  आले लसणाची पेस्ट घ्या एक मोठा चमचा
 9.  शिमला बारिक अर्धा कप
 10.  हळद पाव चमचा
 11. लाल मिर्च पावडर दीड चमचा 
 12. जिरा पावडर १ चमचा 
 13. पाव भाजी मसाला एक मोठा चमचा 
 14. लिंबाचा रस एक मोठा चमचा 
 15. मीठ चवीनुसार 
 16. तूप दोन चमचे  
 17. तेल दोन मोठे चमचे 
 18. कोथिंबीर चिरून दोन मोठे चमचे 
pav bhaji recipe in marathi

कृती

 • वरील दिलेल्या हिरवा वाटाणा , बीन्स , बटाटा ,कोबिफ्लॉवर , गाजर ह्या सर्व भाज्या बारीक चिरून घ्या .एक मोठा कुकर घ्या त्यामध्ये ह्या सर्व भाज्या चिरून चवीनुसार मीठ व अर्धा काप पाणी घाला . कुकर च्या दोन शिट्टी होई पर्यंत ह्या  भाज्या शिजवून घ्या . 
 •  दोन शिट्टी झ्याल्यावर गॅस बंद करा . कुकर थंड होऊद्या ५ ते ७ मिनिटांनी कुकर थंड होईल ह्या भाज्या शिजल्या आहेत का ते पहा . आता मिक्सर मध्ये ह्या शिजलेल्या भाज्या टाका व बारीक करा इथे तुम्ही म्यॅशेर चा सुद्धा उपयोग करू शकता . 
 •  एक कढई घ्या त्या मध्ये दोन चमचे तेल व मख्खन टाका . तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कांदा बारीक करून टाका व तो परतवून घ्या . पुढे कढई मध्ये आले लसूण पेस्ट टाका व पुन्हा परतून घ्या . टोमॅटो व शिमला मिर्च सुद्धा या कढई मध्ये बारीक करून टाका व पुन्हा परता. 
 • कढईमधे टाकलेला कांदा  , टोमॅटो , शिमला मिर्च व्यवसिथ बारीक होई पाईयंत  परतून घ्या आता या मध्ये  हळद पाव चमचा ,लाल मिरची पावडर, जिरे पावडर, एक चमचा धने पावडर, एक चमचा पावभाजी मसाला, टाका सर्व मिश्रण व्यवस्तीत परतवून घ्या . एक मिनिटापर्यंत चांगले परतून घ्या आता या मिश्रणामध्ये साडे तीन कप पाणी घालावे व पुन्हा व्यवस्थित मिसळून घ्या व तीन ते चार मिनिटे  मिनिटांसाठी शिजवून घ्या .
 • आपण सुरुवातीस ज्या भाज्या शिजवून बारीक करून घेतल्या होत्या त्या यामध्ये टाका व त्याचबरोबर लिंबाचा रस एक चमचा टाका पुन्हा सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या व पाच ते सहा मिनिटांसाठी शिजवून घ्या .आता यामध्ये चवीनुसार मीठ टाका .
 • आता आपली भाजी झालेली आहे यामध्ये मीठ कमी किंवा जास्त आहे हे  पाहण्यासाठी ती थोडीशी चाखून पहा, जर कमी असेल तर थोडे मीठ त्यामध्ये टाका . आता या भाजीवर कोथिंबीर टाकावी . ही आपली पावभाजी ची भाजी  तयार झालेले आहे.

पाव तयार करण्याची कृती

एक पॅन किंवा तवा गरम करण्यासाठी घ्या. तो थोडा गरम झाल्यावर त्यावर मग मक्खन टाका. पाव मधून कापून घ्यावे व तवव्यावर गरम करा.

पाव दोन्ही बाजूंस अल्टुं पालटून गरम करून घ्या .सर्व पाव अशाच प्रकारे गरम करून घ्या व गरम झाल्यानंतर एका प्लेट मध्ये काढून घ्या. त्या सोबत भाजी व लिंबू आणि कांदा सोबत खायला द्या.

जर तुम्हाला हि pav bhaji recipe in marathi रेसिपी आवडलेली असल्यास हि रेसिपी तुम्ही शेअर करा व खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *