pani adva pani jirva nibandh for children’s | पाणी आडवा पाणी जिरवा निबंध

आज आपण pani adva pani jirva nibandh | पाणी आडवा पाणी जिरवा निबंध  हा निबंध पाहणार आहोत. 

या निबंध च्या माध्यमातून तुम्ही सहजपणे नवीन निबंध लिहू शकता . हा निबंध तुम्हाला शाळेमध्ये विचारतात तर चला चला निबंध लिहुयात .

पाणी आडवा पाणी जिरवा

पाणी आडवा पाणी जिरवा या वाक्यात  एक मोठा अर्थ लपला आहे . पाणी आडवा म्हणजे पावसाचे पाणी असेल व नदीचे पाणी, ओढ्याचे पाणी, तलाव त्याची पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे .

पाणी हे जीवन आहे पाण्यावाचून कधीच काहीही चालत नाही.  अन्न शिवाय आपण दोन ते तीन दिवस जगू शकतो पण पाणी शिवाय काही तासच . आज निसर्ग खूप लहरी  झाला आहे.  कधी धो-धो पाऊस तर कधी दुष्काळ अशा परिस्थितीत पाणी ही खूप मोठी भूमिका बजावते . 

जगाची लोकसंख्या खूप वाढलेले आहे व वाढतच चालली आहे.  पाण्याचे स्त्रोत नष्ट होत चाललेले आहेत.  नद्या या अतिक्रमणांनी व्यापले आहेत . ओढे मुजावले  जात आहेत अशा वेळी पाणी जमिनीत मुरवणे हा एकच पर्याय शिल्लक आहे . 

आज झाडे तोडली जात आहेत त्याप्रमाणे त्याची लागवड मात्र होत नाही.  माणसे नद्यांमधील वाळू उपसत  आहेत. 

त्यामुळे नद्याची पाणी साठवण्याची व मुरण्याची क्षमता संपली आहे.  वृक्षतोड होत असल्याने पाऊस वेळेवर पडत नाही.  त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती ओढवते.  शहरामध्ये पाणी  अडवणे हे अशक्यच आहे.झाडे  इतर नावालाच आहेत अशा वेळी पाणी अडवले हे खूप गरजेचे आहे. 

शासन त्यांच्या त्यांच्या मार्गाने प्रयत्न करीत आहे परंतु पाणी अडवणे ही एक लोकचळवळ झाली पाहिजे यासाठी प्रयत्न सुद्धा केले पाहिजेत . 

आपण खालील मार्ग  पाहूया त्याद्वारे पाणी अडवून जिरवले जाऊ शकते.  बंधारे बांधणे –  ओढ्या वरती बंधारे बांधले पाहिजेत .

गावोगावी यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत . लोकांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले पाहिजे.  शासनाने बंधारे बांधण्यासाठी स्पर्धा आयोजित केल्या पाहिजेत व अनुदान उपलब्ध करून दिले पाहिजेत . 

धरणे बांधली पाहिजेत लहान धरणे बांधली पाहिजेत . धरणे आपले पाण्याची समस्या सोडवू शकतात परंतु धरण्यासाठी सुपीक व वनांची जमीन जाते त्यामुळे वनसंपदा नष्ट होण्याची भीती असते .

धरणे बांधली  तर आपल्या पिण्याच्या पाण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मिटेल तसेच औद्योगिक करण्यासाठी लागणारे पाणी सुद्धा उपलब्ध होईल . त्यामुळे छोटी धरणे बांधने  आवश्यक आहेत. 

pani vachava in marathi

तलाव बांधणे  तलाव बांधल्याने पाणी जमिनीत मुरेल.  आसपासच्या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल . पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीत मुरेल शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची मोठी सोय होईल. 

लोकवर्गणीतून तलाव बांधले गेले पाहिजेत.  डोंगरावरती चऱ्या खोदल्या पाहिजेत.  आपल्याला खूप मोठी व जास्त प्रमाणात डोंगर आहेत आणि त्यावर पडणारे पावसाचे पाणी वाहून जाते व ते थांबत नाही. 

डोंगर उतार असल्यामुळे पाणी ते वाहून  समुद्राला जाऊन मिळते . अशा वेळेस डोंगरावर चऱ्या  खोदल्या पाहिजे.  त्यांन पाणी जमिनीत मुरण्यास वाव मिळेल . 

वृक्ष लागवड लागवड केली पाहिजे वृक्ष लागवडीमुळे जमिनीची धूप होत नाही पावसाचे पाणी मुरण्यास मदत होते तसेच पर्जन्यमान सुद्धा वाढेल .

त्यामुळे झाडाची लागवड मोठ्या प्रमाणात केली पाहिजे.  रेन वॉटर हार्वेस्टिंगसुद्धा गरजेचे आहे .  सोसायट्या व घर  वरती रेन वॉटर हार्वेस्टिंग केली पाहिजे.  रेन वॉटर हार्वेस्टिंग ने  पाणी जमिनीत मुरेल व पाण्याची पातळी वाढेल.

  आज आपल्या देशात लोकपाणी  पिण्यासाठी दूरवरून  आणतात. गुजरातव राजस्थान  मध्ये खूप वाईट परिस्थिती आहे .

त्यामुळे जर पाणी अडवले तर पाण्याची जमिनीतील पातळी वाढेल व  पाणी विहिरीला उपलब्ध होईल . त्यांन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल .

 जर एखाद्या वर्षी जर पाऊस पडला नाही तर दुष्काळाची स्थिती उद्भवणार नाही.  साठवलेले पाणी उपयोगी पडेल त्यामुळे पाणी आडवा पाणी जिरवा हे घोषवाक्य घेऊन सरकारने एक मोठी चळवळ उभी केली पाहिजे व सर्व नागरिकांनी त्यासाठी स्वतःला झोकून दिले पाहिजे.  हे काम लोक सहभागातून शक्य आहे . त्यामुळे लोकसहभाग महत्त्वाचा आहे .

 

तुम्हाला जर ही आमची pani adva pani jirva nibandh |पाणी आडवा पाणी जिरवा निबंधपोस्ट आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा . 

Leave a Comment