Home » Testy and easy palak paneer recipe in marathi | पालक पनीर भाजी

Testy and easy palak paneer recipe in marathi | पालक पनीर भाजी

palak paneer recipe in marathi language
Spread the love

आज आपण palak paneer recipe in marathi मध्ये पाहणार आहोत . पालक पनीर ही उत्तर भारतातील सर्वात लोकप्रिय डिश आहे .  हे पालक पनीर मध्ये पालक व पनीर चा वापर करून पालक पनीर बनवतात. पालक पनीर जीवनसत्व नि युक्त अशी ही रेसिपी आहे.

पालक पनीर ही पंजाबी डीश आहे .परंतु महाराष्ट्र मध्ये खूप लोकप्रिय झाले आहे . जे लोक शाकाहारी  आहेत त्यांच्यामध्ये ही डिश  खूप लोकप्रिय आहे .50 मिनिटाचे ते एक तासा मध्ये तुम्ही पालक पनीर आरामशीरपणे बनवू शकता .

आमच्या रेसिपी च्या मदतीने तुम्ही हॉटेल सारखी पालक पनीर घरच्या घरी बनवू शकता .तर चल आपण palak paneer recipes in marathi  बनवूयात . 

आमच्या दुसऱ्या खाली दिलेल्या रेसिपी सुद्धा वाचू शकता .

 1. uttapam recipe in marathi
 2. dahi vada recipe in marathi

palak paneer marathi साहित्य

 1. पनीर अर्धा कप लहान तुकडे असलेली पनीर घ्या
 2. पालक चार वाट्या बारीक चिरलेली भाजी
 3. आले पेस्ट एक चमचा 
 4. एक मोठा कांदा बारीक चिरलेला 
 5. गरम मसाला अर्धा चमचा 
 6. मेथी एक मोठा चमचा 
 7. मलई तीन मोठे चमचे
 8.  एक लहान चमचा लिंबूरस
 9.  पाणी दोन कप 
 10. मीठ चवीनुसार
 11.  तेल दोन मोठे चमचे 
 12. हिरव्या मिरच्या दोन ते तीन

 

palak paneer recipe in marathi-

कृती

 1. पालकाची भाजी धुवून बारीक चिरून घ्या. पालक चिरल्यानंतर  एका भांड्यामध्ये शिजवण्यासाठी ठेवा. मध्यम आचेवर तीन ते चार मिनिटांसाठी पालक शिजवा. त्यामध्ये थोडे मीठ सुद्धा टाका. तीन ते चार मिनिटानंतर पालक गॅस वरून खाली घ्या. चाळणीच्या साह्याने पाणी वेगळे करून घ्या .आता शिजलेल्या पालकांमध्ये थंड पाणी घाला, एका मिनिटापर्यंत ते ठेवा .
 2. एक मिक्सर घ्या त्यामध्ये हिरव्या मिरच्या, आले किंवा आले पेस्ट व चिरलेली पालक टाका व सर्व बारीक मिक्सरमध्ये करून घ्या.एक कढई घ्या  त्यामध्ये थोडे तेल टाका व पनीर लालसर होईपर्यंत मध्यम आचेवरती परतवून घ्या . 
 3. पनीर तयार झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या त्याच कढई मध्ये पुन्हा दोन चमचे तेल टाका  होता .मध्यम आचेवर तेल गरम करा .यामध्ये  बारीक केलेला कांदा टाकावा व लालसर रंग येईपर्यंत तळून घ्या. आता त्यामध्ये लसणाची पेस्ट टाका व पुन्हा थोडावेळ तळा .
 4. या कढई मध्ये आता पालक चे  बारीक केलेले मिश्रण, गरम मसाला, चवीपुरते मीठ टाकावं ते शिजवून घ्या . शिजवताना व्यवस्थित हे सर्व मिक्स करुन घ्या.या मध्ये अर्धा कप पाणी ओता. व्यवस्थित शिजवा . गॅस मध्यम आचेवर ठेवा पालकाला उकळी आल्यावर त्यामध्ये पनीर चे  तुकडे टाकावे व पुन्हा सर्व चार ते पाच मिनिटांसाठी शिजवा . 
 5. आता यामध्ये मेथीचे दाणे आणि लिंबाचा रस टाकावा. व्यवस्थित हलवून घ्या. आता गॅस बंद करा. यामध्ये मलई मिक्स करा व पुन्हा सर्व मिश्रण हलवून घ्या . पालक पालक पनीर ची  भाजी तयार झाली आहे.

टिप्स

 1. पनीर जर कठीण असेल तर पनीर गरम पाण्यामध्ये  दहा मिनिटांसाठी भिजत ठेवा. पनीर मऊ होतात.
 2. मलई भाजी झाल्यानंतर टाकावे जर मला आधी मिसळली तर मलाई फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे मलाई  पालक ची भाजी झाल्यानंतर त्यामध्ये मिसळा . 
 3. तुम्हाला जर तेल  जास्त ते खायचे नसले तुम्ही पनीर तेलात न टाकता  पनीर तसेच डायरेक्ट वापरू शकता . 
 4. तुम्हाला भाजी जास्त जणांसाठी करायची असेल तर त्यामध्ये थोडे पाणी वाढू शकता. परंतु असे करताना मसाल्यामध्ये सुद्धा वाढ करावी लागेल.
 5. तुम्ही पालक पनीर मध्ये टोमॅटोचा पल्प सुद्धा वापरू शकता.

 

वरील दिलेल्या कृतीप्रमाणे तुम्ही पालक पनीर ची भाजी व्यवस्थितपणे करू शकता . हि palak paneer recipe in marathi जर तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही शेअर करा व तुमच्या मित्रांना शेअर करा व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *