माझे घर निबंध|my house essay in marathi for students

नमस्कार मित्रानो आज आपण माझे घर निबंध my house essay in marathi या विषयावर लिहणार आहोत . माझे घर हा निबंध तुम्हाला शाळेमध्ये विचारतात तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा विचारतात तर तुम्ही ह्या निबंध च्या माध्यमातून नवीन निबंध लिहू शकता .

maze ghar essay in marathi

माझे घर निबंध माझे घर माझ्या आपल्या आयुष्यात आनंद देणारी आणि हवीहवीशी वाटणारी जागा आहे.

माझे घर हे एका लहान गावात आहे माझे घर गावच्या मध्यभागी असून माझ्या घरासमोरच एक जुने गणपतीची लहान मंदिर परंतु दगडी बांधकाम मध्ये असलेले हे सर्वात पुराने पुरातन काळातील मंदिर आहे .

माझे घरी माझ्या वडिलांनी बांधले असून त्यासाठी त्यांनी खुप सारे कष्ट घेतले आहे . माझे घर हे लाकूड विटा सिमेंट यांनी बांधलेले आहे त्यामध्ये तीन खोल्या व एक मोठी खोली आहे व खोलीच्या शेजारी आमचे स्नानगृह व शौचालय आहे व समोरच स्वयंपाक घर सुद्धा आहे. घरच्या पूर्वेला छोटीशे सभागृह सुद्धा आहे. आम्ही आमच्या घरात माझे आजोबा, आजी,वडील,आई , लहान भाऊ आणि व लहान बहीण एवढे सर्व जण आनंदाने राहतो.

माझ्या घराच्या भोवती आम्ही लहान बाग तयार केली आहे त्यामध्ये आम्ही भाजीपाला लावतो. त्यामध्ये सुंदर फुलझाडे व कोबी, बटाटा, टोमॅटो व इतर भाज्या सुद्धा लावतो .

my house essay in marathi

आमच्या बाल्कनीच्यावर  आणि घराच्या समोर बाजूला आम्ही कुंडीमध्ये छान फुलांची झाडे लावली आहेत.

त्या फुलांच्या झाडावर छान फुले असतात आणि ही फुले घराला चांगली शोभा देतात . आमच्या घराच्या बाहेर पाच मोठी झाडे सुद्धा आहेत.  ही झाडे आम्हाला सावली तसेच फळेसुद्धा देतात . हि झाडे तीन आंब्याची व दोन रामफळाचे आहे .

त्या झाडांना चांगली फळे  लागतात ती फळे आम्ही खातो व झाडे आम्हाला सावलीसुद्धा देतात.  आमच्या घराच्या बाजूला माझे मित्र राहतात ती नेहमी आमच्या घरी खेळायला येतात व त्यांना सुद्धा आमचे घर खूप आवडते . 

आमच्या घरामध्ये आम्ही खूप सजावट केली आहे आम्ही भिंतीवर हत्तीचे, मोराचे चित्र काढले आहे.  तर आमच्या बाबांनी सुद्धा त्यावर  बाराखडी अंक लिहून ठेवले आहेत.  आमच्या घराला  सुंदर रंग देण्यात आला आहे व हा रंग सर्वांना आवडतो कारण त्यामुळे आमचे घर खूप सुंदर दिसते. 

आमच्या घराच्या शेजारी लोक खूप छान आहेत ते आम्हाला खूप मदत करतात.  ही मुलं व मिसळून राहतो आमच्या घरासमोरील गणपतीचे मंदिर सुद्धा खूप छान आहे . ते मंदिर खूप जुनी आहे आम्ही नेहमी देवाच्या दर्शनाला जातो दगडी बांधकाम असलेले हे मंदिर आहे . 

आमच्या घराला एक टेरेस सुद्धा आहे त्यामधून  आम्ही संपूर्ण गाव पाहू शकतो.  आम्ही टेरेसवर छान व सुंदर फुलांची झाडे लावली आहेत .

त्यामध्ये गुलाब मोगरा, चमेली अशी फुलांची झाडे आहेत . आमच्या घराच्या अंगणामध्ये तुळशीचे झाड सुद्धा आहे . आई  त्या झाडाची रोज पूजा करते व पाणी घालते . आमच्या सर्व भावंडां साठी एक अभ्यास खोली  बनवली आहे.  त्यामध्ये आम्ही सर्व पुस्तके ठेवली आहेत.

ह्या खोलीमध्ये खूप पुस्तके आहेत . आमच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये संगणक सुद्धा आहे.  आमचे बाबा आम्हाला  संगणक शिकवतात . 

आम्ही आमच्या घराच्या पाठीमागे असलेल्या जागेत क्रिकेट खो-खो असे खेळ खेळतो . ही जागा थोडीशी मोठी असल्याने आम्हाला दुसरा मैदाना मध्ये जाण्याची गरज नाही . आम्ही सर्वजण मित्र मिळून वेगवेगळे खेळ खेळतो. 

उन्हाळ्यामध्ये आमच्या घरामध्ये उकडत  नाही याचे कारण आमच्या घराला खूप मोठ्या असलेल्या खिडक्या व शेजारी असलेले झाडे.  त्यामुळे घरातील हवा खेळती राहते व उकडत  नाही . असे हे आमचे छान व सुंदर छोटेसे घर आहे. 

 

जर तुम्हाला हा माझे घर  निबंध | my house essay in marathi आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खालील मध्ये कंमेंट करा .

तुम्ही आमचे दुसरे खालील निबंध सुद्धा वाचू शकता .

  1. duskal marathi essay
  2. maze baba nibandh in marathi
  3.  

Leave a Comment