Home » Medu vada recipe in marathi by manisha

Medu vada recipe in marathi by manisha

medu vada recipe in marathi
Spread the love

आज आपण medu vada recipe in marathi मध्ये पाहणार आहोत . सांबर वडा किंवा मेंदू वडा ही मुख्यतः दक्षिण भारतातील डिश आहे परंतु आता महाराष्ट्र मध्ये सुद्धा ही आता फेमस झालेले आहे.  महाराष्ट्र मधील कोणत्याही हॉटेलमध्ये सहजपणे मिळणारा हा पदार्थ आहे.

तर आज आपण मेंदू वडा रेसिपी मराठीमध्ये पाहणार आहोत.  आज आपण करणार आहोत हा कोणत्याही डाळी चा करतात . उदाहरणार्थ उडीद डाळ, मूग डाळ यापैकी कोणतीही डाळीने हा वडा बनवतात. 

तुम्ही आमच्या खालील रेसिपी सुद्धा वाचू शकता .

 1. bread patties recipe in marathi
 2. misal pav recipe in marathi
 3. recipe of dhokala in marathi

medu vada in marathi साहित्य

मूग डाळ किंवा हरभरा डाळ अर्धा कप 

उडीद डाळ १ कप 

 मीठ स्वादानुसार 

आले लसूण पेस्ट  एक चमचा 

कोथिंबीर एक चमचा

 तेल लागेल तेवढेmedu vada recipe in marathi language

कृती

 1. एका भांड्यात मूग डाळ व हरभरा डाळ घ्या.  त्यामध्ये पाणी टाकून ते व्यवस्थित धुऊन घ्या व पुन्हा पाणी टाकून ते तीन ते चार तास भिजत ठेवा . तीन ते चार तासाने भांड्यातून पाणी काढून बाजूला करा व एक मिक्सर घ्या . त्यामध्ये हे भिजलेली डाळ टाका व थोडे पाणी टाकून बारीक करून घ्या . पूर्णपणे डाळ बारीक करू नका थोडीशी जाडसर ठेवा .
 2. आता घट्ट मिश्रण झाल्यावर ते एका भांड्यात काढा व दोन ते तीन मिनिटे  एका हाताने फिरवा म्हणजे असे केल्याने वडे मुलायम होतात व हलके होतात . जर मिश्रण व्यवस्थित झाले आहे की ही नाही पाहण्यासाठी  मिश्रण  मधील एक थेंब पाण्याने भरलेल्या भांड्यात टाका . जर हा थेम्ब पाण्यावरती तरंगले तर मिश्रण  चांगले झाले आहे असे समजा. 
 3. आता मिक्सर मध्ये एक जिरे चमचा,  हिरवी मिरची दोन ते तीन बारीक चिरून कोथिंबीर बारीक केलेली अर्धा चमचा,  काळी मिरची, हिंग अर्धा चमचा हे टाका वरील सर्व पदार्थ मिश्रण टाकल्यावर ते व्यवस्थित हलवा व मिश्रण घट्ट करा. 
 4. आता एक कढई घ्या त्यामध्ये तेल टाका गॅस मध्यम आचेवर ठेवा.  आता मिश्रणातून एक गोळा बनवा थोडा चपटा करा त्याला मधून बोटाने होल  पाढा. 
 5. तेल गरम झाल्यावर थोडे थोडे ही वडे टाका त्यांना व्यवस्थित दोन्ही बाजूनी तळून घ्या व ती सोनेरी रंगाची होईपर्यंत तळा.  आता हे तळलेले वडे एका पेपर वरती काढा. पेपर वर हे वडे  ठेवल्याने त्यामधील जादा तेल शोषून घेते व हे वडे गरम सांबार सोबत खाण्यासाठी द्या . अशा तऱ्हेने आपल्याला आपली medu vada  रेसिपी तयार झालेली आहे.

टिप्स

 1. डाळीची मिश्रण  बनवताना पाण्याचा वापर कमी करा कारण मिश्रण हे घट्ट  हवे, जर पाणी जास्त झाल्यास वडे व्यवस्थित होत नाहीत. 
 2. डाळीचे मिश्रण  करताना मिक्सरमध्ये ते जास्तीत जास्त बारी करू नका जर मिश्रण पाणी जास्त झाले असेल तर त्यामध्ये तांदळाचे पीठ टाका त्याने मिश्रण घट्ट होते.
 3.   तेल जास्त गरम करू नका कारण ते जास्त गरम झाल्याने  वडे वरून शिजलेला  दिसतो परंतु आतून आतून ते कच्चे राहतात.

तुम्हाला हि Medu vada recipe in marathi language आवडली असल्यास सगळ्यांना शेअर करा व खालील कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *