maze ajoba essay in marathi for school students | माझे आजोबा निबंध

Spread the love

आज आपण माझे आजोबा निबंध | maze ajoba essay in marathi या वर निबंध लिहणार आहोत . सर्वाना आजोबा असतात . ते सर्व बच्चे कंपनीचे लाडके असतात . ते प्रेमळ व लहान मुलांचे लाड करणारे असतात .

 माझे आजोबा मराठी निबंध वर निबंध लिहायला खूप सोपा आहे कारण सर्वाना आजोबा असतात त्यामुळे त्यांच्या बद्दल लिहणे खूप सोपं आहे . 

my grandfather essay in marathi

माझे आजोबा एक प्रेमळ  स्वभावाचे आहेत. मी लहान असल्यापासून मी  माझ्या आजोबांकडे मी असायचो . माझे आजोबा घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती आहेत.  सर्वजण त्यांचा आदर करतात. 

माझ्या आजोबा हे संरक्षण दलात होते.  त्यामुळे त्यांची कडक  शिस्त होती त्यामध्ये आम्हाला शिस्तीत कशे राहायचे  व जगायचे . याबद्दल ते नेहमी सांगायची . 

आमच्या गावातील सर्व लोक त्यांचा आदर करतात . ते जास्त शिकलेले न्हवते पण त्यांना असलेले ज्ञान ही शिकलेल्या व्यक्ती सारखी होते .

माझे आजोबा सकाळी पाच वाजता उठतात . अंघोळ करून शेतात जातात शेतातून माघारी संध्याकाळी येतात .

माझी आजी किंवा वडील त्यांना जेवण शेतात घेऊन जात असतात.  माझे आजोबा आम्हाला सुद्धा सुट्टीच्या दिवशी शेतात घेऊन जातात.  माझ्या आजोबांना शेतीची खूप आवड आहे ते शेतात निरनिराळे प्रयोग करत असत त्यामुळे त्यांची अनेक शेतकरी त्यांना भेटायला येतात. 

आम्ही सुद्धा सुट्टीच्या दिवशी शेतात जात असे त्यामुळे शेतातून आल्यानंतर आम्हाला गावात घेऊन जातात व  संपूर्ण गाव  फिरवीत असे आणि संध्याकाळी घरी आणत . 

maze ajoba essay in marathi
maze ajoba essay in marathi

आम्ही त्यांच्याबरोबर नित्यनेमाने देवळात जातो . आजी आजोबा आमची खूप काळजी घेतात . आम्ही जर खाऊ मागेल ते आम्हाला खाऊ आणून देतात.  आजोबा खूप कष्टाळू आणि प्रामाणिक आहेत. 

आम्हाला ते रोज छान छान गोष्टी सांगात .  आम्हाला  कधी कधी शाळेत सोडायला येत असतात .  शाळेतून घरी अन्यन्यसाठी सुद्धा  येतात. 

आमचे आजोबांची शिक्षण कमी असल्याने ते आम्हाला अभ्यास घेत नसत परंतु त्यांची आमच्यावरती बारीक लक्ष असतं. 

ते आम्हाला गोष्टी मधून चांगले संस्कार कसे होतील याची काळजी घेत असे . जर आम्ही हट्ट केला तर ते आम्हाला आमच्या मामाच्या गावी सुद्धा नेट असे .

  गावातील लोक त्यांना आदराने अण्णा या नावाने हाक मारत . आम्ही सुद्धा त्यांना अण्णा च्या नावाने हाक मारतो . अण्णा आमचे सर्व घरातील सार्वजनिक कार्यक्रमात पुढे असत. 

ते सर्वांना मदत करतात . त्यामुळे ते  सर्वांचे लाडके आहेत . आमच्या घरातील सर्वजण त्यांना विचारूनच निर्णय घेतात त्यांचा शब्द हा अंतिम शब्द असतो . 

त्यांचे आमच्या घरातील सर्वांवर प्रेम आहे. त्यांची राहणी साधी पण  विचाराने उच्च आहेत.  त्यांच्या अंगात कायम सदारा आणि डोक्यावर टोपी असे आमचे आजोबा च पेहराव असतो .

आजोबा हे स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी भाग घेतला होता . देश स्वतंत्र झाल्यावर त्यांनी आर्मी जॉईन केली. त्यांनी युद्धामध्ये  सुद्धा भाग घेतला. 

त्यांच्यावर गांधीजींच्या विचारांचा पगडा आहे ते देश व भूमातावर  खूप प्रेम करतात . आम्हाला सुद्धा ते देशाचा व काळ्या मातीचा आदर करायला सांगत . असे आमचे आजोबा प्रेमळ आहेत व ते आम्हाला  खूप आवडतात व आमचे  त्यांच्यावर ती खूप प्रेम आहे. 

जर तुम्हाला आमचा हा maze ajoba essay in marathi for school students | माझे आजोबा निबंध आवडला असल्यास तुम्ही तो तुमच्या मित्रांना शेअर करा व खालील कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा . 

Read this also –

1. mobile shap ki vardan 

2. loksankya vadhiche dushparinam 

3. ajachi stri nibandh

 

Leave a Comment