माझा आवडता विषय मराठी निबंध | maza avadta vishay marathi nibandh for students

Spread the love

maza avadta vishay marathi nibandh | माझा आवडता विषय मराठी निबंध तुम्हाला शाळेमध्ये हा निबंध विचारतात किंवा परीक्षेमध्ये सुद्धा किंवा परीक्षा स्पर्धा परीक्षेमध्ये हा निबंध विचारला जातो.

माझा आवडता विषय निबंध हा खूप सोपा निबंध असून तुम्ही या निबंधाच्या साहाय्याने नवीन निबंध सहजपणे लिहू शकता. ह्या निबंध अनेक प्रश्नाच्या माध्यमातून विचारू शकतात जसे – majha avadta vishay marathi,favourite subject essay

maza avadta vishay marathi nibandh

 माझा आवडता विषय इतिहास आहे. मला हा विषय  वाचायला खूप आवडतो.  मी इतिहासामध्ये शाळेत पहिला क्रमांक काढतो . पहिली ते चौथीच्या इतिहास मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शिकवला जातो . हा इतिहास वाचण्यासारखा आहे . 

इतिहास हा प्रेरणादायी असून त्यामधून बरेच शिकण्यासारखे असते . छत्रपती शिवाजी महाराज, नेपोलियन बोनापार्ट, नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या कडून काहीतरी शिकण्यासारखे असते . त्यांचे विचार त्यांचे धाडस हे वाखाणण्याजोगे असते . त्यांनी  त्यांच्या आयुष्यात कसा संघर्ष केला व आपण कसा संघर्ष केला पाहिजे हे इतिहास मुले  आपणास शिकण्यास मिळते . 

पाचवी ते दहावीपर्यंत स्वातंत्र्यसंग्राम याचा इतिहास शिकवला जातो . यामध्ये लोकमान्य टिळक, गांधीजी,  नेहरू यांनी देशासाठी काय केले व कसे स्वातंत्र्यसंग्राम मध्ये  त्यांचे योगदान याविषयी शिकण्यास व माहिती मिळते  इतिहास मध्ये आपण मानवाच्या उत्पत्तीपासून ते आत्ता पर्यंतचा इतिहास  वाचायला मिळते.

favourite subject essay

 इतिहास वाचला कुणालाही कंटाळा येणार नाही असा हा विषय आहे .  तुम्हाला इथे संबंधित सर्व धर्माचा इतिहास वाचायला मिळतो.  इतिहास विषय हा एवढा मोठा आहे की वाचन तेवढाच कमी आहे . आपल्या देशाचा इतिहास खूप मोठा आहे.  परकीय आक्रमणे ,इंग्रजांचे राज्य, स्वतंत्र काळातील संग्राम असे अनेक रूपे आपणास पहावयास मिळतात . 

जगाचा इतिहास सुद्धा तुम्ही वाचू शकता . पहिले महायुद्ध दुसरे महायुद्ध यामधून मानव अनेक धडे घेऊ शकतो . आपण इतिहास पहिली पासून ते बारावीपर्यंत शिकतो .  यामध्ये अनेक महावीर तसेच स्वातंत्र्य काळातील संघर्ष, स्वातंत्र्य साठी दिलेला लढा वाचण्यासारखा आहे .

महात्मा गांधी यांचा जीवनपट जीवन चरित्र हे सुद्धा वाचण्यासारखे आहे . त्यांनी दिलेले योगदान हे आपल्याला वाचल्यानंतर कळते . इंग्रजांनी 150 वर्षे राज्य आपल्या देशावरती केली पण महात्मा गांधींनी त्यांना अहिंसेच्या माध्यमातून त्यांना ह्या देशातून घालवले . त्यामुळे त्याचा इतिहासामधून  महात्मा गांधीजींचे महात्मा आपल्याला कळते . 

तसेच महात्मा ज्योतिबा फुले मदर टेरेसा यांचा सुद्धा इतिहास वाचणे सारखाच आहे . त्यांनी केलेले समाज कार्य ही वाचण्यासारखे आहे. 

आपला भारताचा प्राचीन इतिहास सुद्धा वाचण्यासारखा आहे . त्यामध्ये हिंदू धर्माचा उत्पत्ती बौद्ध धर्म जैन असे अनेक धर्माचे उत्पत्ती व त्यांचा प्रचार-प्रसार याविषयी वाचण्यास मिळते.  त्यानंतर मुघलांनी आपल्यावर केलेले आक्रमण त्यांनी केलेला आपल्या देशावर अत्याचार व त्यामध्ये जनता कशी भरडली गेली व शिवाजी महाराजांनी  कसे मुक्त केले व आपल्या स्वराज्याची निर्माण केले.  या विषयी माहिती मिळते . 

स्वराज  निर्माण करत असताना त्यांना  कोणत्या अडचणी आल्या व त्यांना कोणत्या मावळ्यांनी साथ दिली व सर्वांनी जीवाची बाजी लावून साथ दिली या विषयीइतिहास मध्ये शिकायला मिळते .  इतिहासाची पुनरावृत्ती होत असते अन्यायाविरुद्ध लढा निर्माण होत असतो असे आपणास पहावयास मिळते . 

इतिहास असा विषय आहे की तो न संपणारा आहे इतिहास अनेक महान लोकांच्या जीवन चरित्र वाचायला मिळते .  धर्मवीर अजून दानशूर कर्ण  असो व मुरलीधर कृष्ण . महाभारत व रामायण हे आध्यात्मिक ज्ञान देते माणसाना आपल्या आयुष्यामध्ये कसे वागायचे हे समजते .  

महाभारत व रामायण या मधून  शिकण्यास मिळते. वरील सर्व कारणांमुळे मला इतिहास विषय आवडतो. शाळेमधील इतिहास असो वा दुसरी  ग्रंथालयातील पुस्तके असो  हे सर्व पुस्तक मला वाचायला आवडतात. 

जर तुम्हाला हा माझा आवडता विषय मराठी निबंध  आवडला असल्यास तुम्ही याचा शाळेमध्ये वापर करु शकता तसेच तुमच्या मित्रांना हा निबंध शेअर करा . 

 

Leave a Comment