माझी आजी निबंध | majhi aaji nibandh in marathi for students

Spread the love

माझी आजी निबंध | majhi aaji nibandh in marathi  –   माझी आजी या विषयावर आज आपण निबंध लिहिणार आहोत.  माझी आजी निबंध | mazi aaji essay in marathi तुम्हाला परीक्षांमध्ये विचारतात .

जर तुम्हाला एक छान निबंध लिहायचा असेल तर तुम्ही खाली निबंधाच्या मदतीने एक चांगला निबंध लिहू शकता . आजी सर्वांना असते काळजी करणारी , प्रेमाने जवळ घेणारी , तर काही शिस्तीची असणारी  असते.  आज आपण  माझी आजी या विषयावर निबंध लिहू या.

mazi aaji essay in marathi

माझ्या आज्जी  एक प्रेमळ व्यक्ती आहे.  माझ्या आजीचा सर्वजण आदर करतात . माझी आजी ही  सातवीपर्यंत शाळा शिकलेली आहे . त्यामुळे माझ्या आजीला लिहायला व वाचायला येते . माझ्या आजीचा घरात धाक आहे आणि तिचे निर्णय सर्वांना मान्य असतात . माझी आजी सकाळी लवकर उठते . देवाची पूजा करते व आम्हालाही देवाची पूजा करायला सांगते . 

आम्ही रोज गावात आजीसोबत देवाला आमच्या गावातील जुन्या मंदिरामध्ये जातो . आम्हाला शाळेत सोडायला आजी रोज येते व संध्याकाळी आणायला  सुद्धा येते . पहिल्यांदा शाळेत जाताना आमच्या सोबत आजी होती जी आम्हाला शाळेपर्यंत सोडायला आली होती . आजी आमच्या अभ्यासाकडे सुद्धा लक्ष देते ती रोज आम्हाला अभ्यास करायला लवकर उठवते . 

aaji marathi

आजी नेहमी चांगले वागण्याचा व  मोठ्यांचा आदर करण्यास शिकवते . आम्ही शाळेतून आल्यावर आम्हाला खाऊ करून देते व आमच्या अभ्यासा सुद्धा लक्ष देते .

रोज रात्री आजी  आम्हाला छान छान गोष्टी सांगते . आम्हाला कृष्णाच्या, राम  यांच्या व राजाच्या गोष्टी सांगते.  आमची आजी आम्हाला सुट्टीच्या दिवशी शेतात नेते  व तिच्या सोबत काम करायला सांगते . आजी कधी कधी शेतात सुद्धा जाते.  आज सुद्धा आजी अगदी ठणठणीत असून ती शेतातील काम करते . 

माझी आजीही साधे राहणीमान व उच्च विचारसरणी ची आहे . माझी आजी आमच्या सर्वांचा लाड करते . ती स्वतःच्या हाताने आम्हाला खाऊ काय तयार करून देते.  आमच्यावर चांगले संस्कार व्हावे यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असते .

आम्हाला छान छान गोष्टी सांगत त्या गोष्टी रामाच्या कृष्णाच्या सांगे जेणेकरून आमच्यावर चांगले संस्कार व्हावेत हा तिचा हेतू असतो . आम्हाला रोज आजी प्रार्थना म्हणायला सांगत असे . 

आम्ही कधी आजारी पडलो तर आमची काळजी घेते व आम्हाला घरच्या औषधाने बरे करीत असे.  घरगुती उपाय यांचा तिचा चांगला अभ्यास आहे .

घरात कोणी आजारी पडले तर घरगुती उपाय करून आजी त्याला बरे करते . आजी कडक  शिस्तीचे असल्याने आम्हाला सुद्धा तिने शिस्त लावली आहे . आम्हाला स्वच्छता ठेवणे याबाबत आग्रही असते.  घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवा त्यासाठी ती नेहमीच सल्ला  देते . ती  रोज सकाळी उठून घरची स्वछता करीत असे व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करते .

माझी आजीही एकदम भोळी आहे मात्र तिला चांगले व्यवहारज्ञान आहे.  सर्वांच्या सोबत ती सर्व मिळून मिसळून  वागते . माझी आजी व मला व माझ्या भावाला आंघोळ घालत असे व शाळेत सोडते व शाळा सुटल्यानंतर ती घरी नेण्यासाठी  येते

अशी आमची आजी आहे तिच्यावर माझे खूप प्रेम आहे . 

जर तुम्हाला हा majhi aaji nibandh in marathi  आवडला असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा . आणि असे दुसरे निबंध पाहायचे असल्यास आमच्या या वर्ल्ड ऑफ मराठी या वेबसाईट  ला नेहमी भेट द्या . 

आमचे खालील निबंध सुद्धा तुम्ही वाचू शकता . 

  1. my house essay in marathi
  2. maze baba nibandh in marathi
  3. diwali essay in marathi

Leave a Comment