loksankhya vadhiche parinam nibandh | लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम

Spread the love

लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम | loksankhya vadhiche parinam nibandh

लोकसंख्या ही देशाला डोईजड  जाते.  याचा साधनसंपत्तीवर खूप ताण येतो . आज भारताची लोकसंख्या ही 137 कोटी आहे.  जगात भारताची लोकसंख्या ही दुसऱ्या क्रमांकावर आहे व लवकरच आपण चीनला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर येऊ. जगाची लोकसंख्या सध्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे .

याचा ताण साधनसंपत्तीवर येत आहे . आज आपल्या देशात अन्नधान्याची टंचाई काही राज्य मध्ये जाणवते . पिण्याच्या पाण्याचीसुद्धा टंचाई तसेच वैद्यकीय सेवांची टंचाई, नोकरी मिळवण्याची समस्या असो वा कोणतीही समस्या ही लोकसंख्या जास्त असल्यामुळे तिचे स्वरूप उग्र  होत आहे.

 पिण्याचे पाणीही मर्यादित स्वरूपात आहे नद्या किंवा भूजल ही काही प्रमाणात  आहे . शहरांना  लागणारे पाणी हे अफाट आहे.  मुंबई किंवा  दिली या  शहरांना प्रचंड प्रमाणात पाणी लागते जर पाऊस पडला नाही तर पाण्याची समस्या निर्माण होते . 

या शहरांवर लोकसंख्येचा ताण येत आहे.  पावसाचे पाणी तेवढेच आहे परंतु त्यावर अवलंबून असणारी  लोकसंख्या ही मात्र वाढत आहे . त्यामुळे या पाणीसाठा वर  खूप मोठा ताण येत आहे. 

आपल्या देशात खूप गरिबी आहे आणि सरकार गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम राबवत आहे, परंतु जे साधने आहे ती अपुरी पडत आहे . अन्नधान्याची उत्पन्न वाढ याला मर्यादा आहे.  पण लोकसंख्या मर्यादा नाही ती वाढतच आहे त्यामुळे  यावर सुद्धा वाढत्या लोकसंख्येचा ताण आहे .

जमिनी काय वाढत  नाही त्या तेवढाच आहेत . पूर्वीच्या काळी येथे घरामध्ये पंधरा ते वीस एकर जमीन असायची . परंतु  त्या जमिनींवर आता त्‍यांची विभाजन होत गेले.  लोकसंख्या वाढीने त्या जमिनी विभाजन होत गेले . आता एका कुटुंबाकडे १ ते २ एकर जमीन राहिले आहे .

जर लोकसंख्या वाढत गेली तर कुटुंबाकडे काही गुंथमध्ये  जमीन येईल त्यामुळे लोकांचे उत्पन्न कमी होईल व लोकांचे जगणे मुश्कील होईल .

loksankhya vadhiche parinam nibandh

नोकऱ्या सुद्धा मर्यादित आहे.  वाढती लोकसंख्या व यांत्रिकीकरण या मुळे त्यावर मर्यादा आले आहेत. नोकरी  प्रत्येकाला मिळणे दुरापास्त होत आहेत.  नोकऱ्या निर्माण होणे पेक्षा लोकसंख्या वाढत आहे . त्यामुळे प्रत्येक व्यक्तीस नोकरी मिळत नाही .

त्यामुळे युवकांच्या मनात निराशा वाढत आहे व लोक व्यसनाकडे व गुन्हेगारीकडे वळत आहेत. या वाढत्या लोकसंख्येमुळे आर्थिक ताण येऊन गुन्हेगारी सुद्धा वाढत आहे . 

वाढत्या लोकसंख्येमुळे घरांची मागणी वाढत आहे घर बांधणीसाठी लागणारे साहित्य व सिमेंट याचे उत्पादन वाढावे लागत आहे . वाढत्या सिमेंटची मागणी मुळे डोंगर पोखरले जात आहे.  झाडे तोडली जात आहेत . झाडे मोठ्या प्रमाणात तोडली जात आहे . त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.  पहिले पुणे किंवा मुंबई सारखी शहरे यांची लोकसंख्या ही लाखात होती ती आता कोटी मध्ये पोहोचली आहे . 

नद्या नाले यावर भराव टाकून शहरी उभारली जात आहेत . त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. 

 दवाखान्यांची संख्या लोकसंख्येच्या मानाने खूप कमी आहे कोरोना  काळात या  सेवेचा पुरता बोजवारा उडला होता . त्याच्यावर प्रचंड ताण आला होता सरकारने जरी दवाखाने उघडले असली तरी ते कमी पडत आहेत . याचे कारण वाढती लोकसंख्या आहे . 

लोकसंख्या वाढल्याने वाहन खरेदीचे प्रमाण वाढले आहे .  वाहनांची संख्या वाढल्याने  रस्ते अपुरे पडत आहेत त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत त्यामुळे होणारे प्रदूर्षण  सुद्धा वाढले आहे . कायदा सुव्यवस्था या गोष्टी लोकसंख्या वाढल्याने कोलमडतात. 

देशात एक हजार लोकांमागे एक पोलिस आहे याचे कारण वाढती लोकसंख्या आहे . लोकसंख्या वाढल्याने गरिबी बेरोजगारी गुन्हेगारी यासारख्या समस्या निर्माण होतात.  परिणामी याचा देशाच्या विकासावर परिणाम होतो व देशाची सुव्यवस्था ढासळते . 

पृथ्वी ही एकच आहे त्यावर भार वाढला आहे .  जर एका खोलीत पाच माणसांची राहण्याची सुविधा असेल आणि आपण पन्नास माणसे त्यामध्ये भरली तर त्या  खोलीमध्ये राहणे तेथे राहणे अशक्य होऊन जाईल.  तसेच आपल्या पृथ्वीचे सुद्धा आहे . वाढती लोकसंख्या ही आपल्यासाठी हानीकारक बाब आहे. 

तुम्हाला हा लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम | loksankhya vadhiche parinam nibnadh निबंध आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खालील कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा .

 

तुम्ही आमचे दुसरे खालील निबंध सुध्दा वाचू शकता .

  1. my house essay in marathi
  2. aajachi stri in marathi
  3. ganesh chaturti in marathi

 

Leave a Comment