Gudi padava nibandh in marathi for students | गुढीपाडवा निबंध

Gudi padava nibandh in marathi for students | गुढीपाडवा निबंध  

आज आपण गुढीपाडवा या विषयावरती निबंध लिहीत आहे. तुम्हाला या विषयावर शाळेमध्ये निबंध विचारतात . तर तुम्ही या निबंध च्या माध्यमातून नवीन निबंध लिहू शकता . 

Essay on gudi padava in marathi

गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण आहे . या दिवशी मराठी नववर्ष सुद्धा सुरू होते . हा सण एक महत्त्वाचा सण  आहे . साडे तीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त  आहे .

चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा सण  महाराष्ट्र मध्ये साजरा होतो . दसरा गुढीपाडवा अक्षय तृतीया हे तीन महत्त्वाचे मुहूर्त आहेत त्यापैकी गुढीपाडवा हा महत्त्वाचा मुहूर्तआहे. 

सर्व जण सण आनंदाने साजरा करतात . हा सण  फक्त महाराष्ट्र मध्ये साजरा करत नाही तर इतर राज्यांमध्ये सुद्धा साजरा करतात.  गोवा कर्नाटक आंध्रप्रदेश मध्ये हा सण साजरा केला जातो. 

या महिन्यांमध्ये वसंत ऋतु ला सुरुवात होते.  या दिवशी अनेक लोक नवीन व्यवसाय सुरू करतात,  सोन्याची खरेदी, वाहन खरेदी,  जागेची खरेदी,  घर खरेदी असे अनेक शुभ कार्य करतात . 

गुढीपाडव्या दिवशी घरोघरी गुढी उभी केली जाते . गुढी उभी करण्यासाठी पहिल्यांदा त्या जागी रांगोळी काढतात . जागा साफ करून घेतात व रांगोळी काढली जाते.  एक बांबूची काठी घेतात ती धून त्याला त्याच्या टोकावर ती साडी, ग्लास , हार, लिंबाचा पाला फुलांचा हार बांधतात व त्याची विधिवत पूजा केली जाते. 

सर्वांचे घरी  गोड पोळ्या केल्या जातात. डावाची पूजा केली जाते . देवाला व गुडी ला नवेद्य दाखवला जातो . 

सर्वजण नवीन कपडे घालतात त्या दिवशी संध्याकाळी ही गुडी  काढली जाते . गुडी काढल्यावर  प्रसाद म्हणून लिंबाचा पाला व गुळ वाटून सर्वांना वाटतात. 

गुढीपाडवा हा खूप महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी रामाने वालीचा वध केला होता . श्रीराम यांचा यांचा याच दिवशी राज्याभिषेक सुद्धा झाला होता . या दिवशी युधिष्टर ने राज्याचे राज्य राज्य रोहन केले होते . याच दिवशी  राजा विक्रमादित्य याने त्याचा पराभव केला होता. 

या दिवशी भगवान ब्राह्मणे ब्रह्मांडाची रचना केली  होती . या दिवशी श्री प्रभुराम यांनी 14 वर्षे वनवास संपवून अयोध्येला आले होते. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दिवशी नवीन वर्ष म्हणून साजरा करतात.  गुढीपाडवा चा अर्थ होतो गुढी म्हणजे विजय पताका पाडवा म्हणजे प्रतिपदा . गुढी पाडव्यापासून  झाडांना नवीन पालवी फुटते सुरुवात होते. 

या दिवशी आरएसएसची सुद्धा स्थापना झाली होती या दिवशी सत युगाची सुरुवात झाली होती.  या गुढीपाडव्यादिवशी गणितज्ञ भास्कराचार्य यांनी सूर्यास्त सूर्योदय दिवस महिने याची मोजमाप करून हिंदू पंचांगाची सुरुवात केली होती . हा साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचामुहूर्त आहे .

या दिवशी नवीन कपडे खरेदी करतात व सर्वजण मंदिरामध्ये सुद्धा जातात व लोक मंदिरात जाऊन या दिवशी पूजा अर्चना करतात. सर्वांच्या घरी गुडी पाडव्याच्या आधीच घर साफ सफाई करतात . सर्वांच्या घरी गाडी धुवून त्याला हार घालतात . घरी सुद्धा हार घालतात . 

अशा प्रकारे गुडी पाडवा सर्व महाराष्ट्र मध्ये साजरा केला जातो . 

हा Gudi padava nibandh in marathi for students | गुढीपाडवा निबंध तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खालील कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा .

आमचे दुसरे निबंध सुद्धा वाचू शकता

1. mhaji aaji nibandh

2. maza avadata chand nibandh

 

Leave a Comment