dushkal marathi essay for school student

आज आपण दुष्काळ निबंध dushkal essay marathi पाहणार आहोत . तुम्हाला शाळेमध्ये हा निबंध विचारतात . हा निबंध शेतकऱ्यांच्या च्या संबंधित आहे . तुम्हाला हा निबंध परीक्षेमध्ये सुद्धा विचारतात . या निबंध च्या मदतीने तुम्ही सहजपणे दुसरा निबंध लिहू शकता .

dushkal marathi essay

दुष्काळ हा शब्द काही नवीन नाही दुष्काळ म्हटले की डोळ्यासमोर दिसतो भयानक परिस्थिती शेतकऱ्यांची जनावरांची होणारे हाल माणसांची पशुपक्ष्यांची होणारे पाण्यापासून होणारे हाल.  दुष्काळ पडल्याने शेतीला तसेच पिण्यासाठी पाणी मिळत नाही.

शेतीचे  खूप नुसकान होते दुष्काळ पडल्याने पिण्याची पाण्याची संकट निर्माण होते . उद्योगासाठी लागणारे पाणी, शेतीसाठी लागणारे पाणी पाण्याची टंचाई निर्माण होते . दुष्काळ पडल्याने वनात तसेच राना  मध्ये राहणारे पशुपक्षी यांचा तडफडून मृत्यू होतो .

अन्नधान्याची टंचाई होते . अन्न कमी असल्याने त्यावर अवलंबून असलेले उद्योग बंद पडतात परिणामी बेरोजगारी वाढते . शेती किंवा पिके  ते वाळून जाते त्यामुळे त्यावर अवलंबून असलेले उद्योग सुद्धा बंद पडतात.  उदाहरण साखर उद्योग जर दुष्काळ पडला तर ऊस उगवणार नाही आणि उस उगवला नाही तर साखर कशी तयार होणार त्यामुळे साखर कारखाने बंद होतील. 

मोठ्या शहरांना होणारा पाणीपुरवठा धरणावर अवलंबून असतो पण धरणामध्ये पाणी नसेल तर शहराला होणारा पाणीपुरवठा सुद्धा बंद होईल . परिणामी सर्वत्र अनागोंदी माजेल माणसेही पाण्यावाचून तडफडून मरून जातील .

दुष्काळ पडण्याची काही कारणे मानवनिर्मित सुद्धा आहेत माणसाने झाडे तोडली आहेत त्यामुळे निसर्गचक्र पूर्णपणे बिघडले आहे. अतिवृष्टी पडत आहे दुष्काळ अशा घटना घडत आहेत . झाडांची कत्तल सुरू आहे परंतु कोणीच नवीन झाडे सुद्धा लावत नाही त्यामुळे निसर्गचक्र बिघडले आहे .

जगाचे तापमान वाढलेले आहे त्यामुळे हिमनग वितळत आहेत. गाड्या कारखाने  आहेत त्याच्यामुळे कार्बन-डाय-ऑक्‍साईड वाढत आहे त्यामुळे निसर्गचक्र बिघडत आहे . तापमान वाढत आहे त्यामुळे कधी दुष्काळ कधी पूर स्थिती येत आहे . 

आज धरणे बांधली आहेत पण जर पाऊस पडला नाही तर दुष्काळी परिस्थिती ओढवते याचे कारण आहे जमिनीत असलेली पाण्याची पातळी हि  कमालीची घटली आहे त्यामुळे एक वर्षे तरी पाऊस पडला नाही तर भीषण परिस्थिती निर्माण होते .

वृक्षतोड झाल्यामुळे जमिनीत पाणी मुरात नाही आणि जमिनीची धूप  होणे असे प्रकार होत आहेत . हरितवायू मुळसुद्धा दुष्परिणाम होत आहेत.  त्यामुळे दुष्काळ हा निसर्गनिर्मित नाहीतर तू मानवनिर्मित सुद्धा आहे .

दुष्काळाशी सामना करायची असल्यास पावसाचे पाणी जमिनीत कसे मुरेल याकडे लक्ष दिले पाहिजे वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात कशी होईल याकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे . तलाव बंधारे याची मोठ्या प्रमाणात निर्माण व बांधणी केली गेली पाहिजे .

तलाव बंधारे बांधले तरच  जमिनीमधील पाण्याची पातळी वाढेल.  त्यामुळे जरी दुष्काळ पडला तरी पाण्याची टंचाई भासणार नाही . रेन वॉटर हार्वेस्टिंग केले पाहिजे म्हणजे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल व त्यामुळे जमिनीतील पातळी पाण्याची पातळी वाढेल . 

देशात बिहार उत्तर प्रदेश आसाम या ठिकाणी नेहमी पूर परिस्थिती असते त्यामुळे जर नद्या जोड प्रकल्प केले तर देशात जिथे दुश्काळ निर्माण होते ते पाणी यांच्याद्वारे पोचवणे शक्य होईल.  शासनाने धोरणात्मक निर्णय घेतले तरी विविध योजना राबवल्या तर दुष्काळाची तीव्रता कमी करता येईल .

शेततळे ठिबक सिंचन, तलाव निर्माण यासाठी अनुदान दिले पाहिजे.  अन्य धान्य साठवणूक क्षमता व त्याची गुणवत्ता वाढवली पाहिजे.  हे सर्व केल्याने दुष्काळ बंद होणार नाही परंतु त्याची तीव्रता नक्कीच कमी होईल. 

तुम्हाला हा Dushkal essay marathi निबंध कसा वाटलं ते खालील कंमेंट बॉक्स मध्ये लिहा व तुमच्या मित्रांना हा निबंध शेअर करा. 

तुम्ही आमच्या खालील निबंध सुद्धा वाचू शकता . 

  1. maza avdata neta essay in marathi
  2. bhrastachar essay in marathi

Leave a Comment