Home » Easy And Best Anda Biyani Recipe In Marathi

Easy And Best Anda Biyani Recipe In Marathi

anda biryani recipe in marathi
Spread the love

नमस्कार मित्रानो आज आपण अंडा बिर्याणी | Anda biryani recipe in marathi कशी बनवायची किंवा egg biryani recipe in marathi मध्ये पाहणार आहोत .

अंडा बिर्याणी हि चिकन बिर्याणी सारखीच असते . ज्यांना मटन बिर्याणी किंवा चिकन बिर्याणी आवडत नाही त्यांच्या साठी हि अंडा बिर्याणी उत्तम आहे . 

अंडा बिर्याणीचा स्वाद सुद्धा चिकन किंवा इत्तर बिर्याणी सारखा लागतो अंडा बिर्याणी हि दुसऱ्या बिर्याणी च्या तुलनेत सोप्पी आहे . अंडा बिर्याणी हि हॉटेल मध्ये व इत्तर ठिकाणी सहज मिळते .

अंडे व बिर्याणी मसाले वापरून हि बिर्याणी  तयार करतात .तर चला आज anda biryani in marathi ची रेसिपी पाहुयात . 

जर तुम्हाला आमचे आणखीन रेसिपी वाचायचे असल्यास खालील लिंक वर जावा .

 1. misal pav recipe in marathi.
 2. dhokala recipe in marathi.
 3. goda masala recipe in marathi

Egg pulao recipe in marathi ingredient | साहित्य

 1. साहित्य – 
 2.  ८ अंडे आधीच उकडवून घ्यावेत .
 3. चांगल्या प्रतीचा बासमती तांदूळ अर्धा किलो 
 4. फ्राईड करून घेतलेला कांदा  २ वाटी  
 5. दही १ वाटी 
 6. आले व लसणाची पेस्ट एक चमचा 
 7. टमाटो बारीक करून घ्या दोन वाटी 
 8. खायचा रंग एक चमचा 
 9. दोन मोठे चमचे तेल 
 10. जिरा पावडर एक चमचा 
 11. हिरव्या मिरच्या सहा ते सात उभ्या चिरलेल्या 
 12. दोन दालचिनी
 13. तेज पत्ती2
 14.  काय इलायची एक ते दोन
 15.  जावित्री एक घ्या
 16.  दगडफूल एक घ्या
 17.  हळद पावडर लहान आमच्या चमच्या
 18.  एक चमचा लाल मिरची पावडर
 19.  एक कप पुदिना
 20.  एक कप कोथिंबीर बारीक केलेली 
 21. येतो मीठ आवश्यकतेनुसार
 22.  एक चमचा तूप
 23.  दोन लवंग 
anda biryani recipe in marathi

egg biryani recipe in marathi language कृती

 1.  एक मोठे  भांडे घ्या .त्यामध्ये पाणी घ्या पाणी जास्त घ्या .त्यामध्ये तांदूळ व्यवथित शिजवता  आहे पाहिजे.  आता त्या  पाण्यात काळी इलायची, तेजपत्ता, दगडफूल, हिरवी इलायची, जिरा पावडर, जावित्री, लवंग व चवीनुसार मीठ हे सर्व टाकून घ्या. हे सर्व टाकल्या नंतर त्यामध्ये  पाणी हलवा  व दोन मिनिटे पाणी उकळून द्या.
 2.  आता तांदूळ व्यवस्थित धुऊन घ्या .वरील  पाण्यामध्ये जो मसाला टाकले होते ते एका गाळणीने  काढून घ्या व त्या पाण्यात बासमती तांदूळ टाका. हा तांदूळ 70 टक्के पर्यंत शिजवून घ्या . ७० % शिजल्यानांतर तो  एका प्लेट मध्ये काढा .
 3. एका भांड्यात दोन मोठे चमचे तेल घाला . त्यामध्ये चिरलेला कांदा, आले लसूण पेस्ट, टोमॅटो चिरून, चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाका व हे सर्व पदार्थ चांगले परतवून घ्या. टोमॅटो व कांदा चांगला गळेपर्यंत परतून घ्या.
 4.   या भांड्यात आता मिरची पावडर, गरम मसाला ,हळद , फ्राईड  कांदा टाका व दोन ते तीन मिनिटं चांगले परतून घ्या. यानंतर दहि यामध्ये व्यवस्तीत मिक्स करा व पुन्हा चांगले परतून घ्या.

5.  आता या तयार झालेल्या मिश्रणात कोथिंबीर व बारीक केलेला पुदिना टाका व पुन्हा मिसळून घ्या.

6. तुम्हाला सुरवातीला  अंडी उकडून घ्यायला सांगितले होते ते उकडलेले अंडे थोडे कट करून घ्या व त्याला काट्याच्या  काट्याच्या चमचे यांच्या साह्याने त्याला होल पाडा जेणेकरून मसाला त्यामध्ये चांगला मिक्स होईल.

7.  आता या सर्व मिश्रणात थोडे पाणी टाका व पाच ते सहा मिनिटे शिजवून घ्या .या भांड्याची मिश्रण किंवा तयार झालेला मसाला  तो व्यवस्थितपणे पूर्ण भाड्यात पसरा व गॅस बंद करा .

8. गॅस बंद करा व पातेल्यामध्ये शिजलेलाबासमती तांदूळ पसरा व त्यावर एक चमचा खायचा रंग, फ्राईड कांदा, पुदिना ,कोथिंबीर बारीक केलेली, तूप हे सर्व टाका.

9. आता एक पिठाचा गोळा तयार करा तयार केलेला पिठाचा गोळा भांड्याच्या कडेने लावून घ्या व त्यावर झाकण ठेवा हे झाकण पीठाने व्यवस्थित सील बंद करा.

10.  एक तवा घ्या त्यावर हे बिर्याणीचे भांडे ठेवा व पुन्हा गॅस चालू करा गॅस मोठा चालू ठेवा जेणेकरून तवा लवकर गरम होईल.  तवा पूर्णपणे गरम झाल्यावर गॅस मध्यम आचेवर ठेवा गॅस दहा मिनिटे मध्यम आचेवर ती चालू ठेवा दहा मिनिटांनी गॅस बंद करा.

11.  गॅस बंद केलं नंतर दहा मिनिटांनी बिर्याणी खायला घेउ शकतात .अशा प्रकारे आपली अंडा बिर्याणी तयार झालेली आहे.

 जर तुम्हाला अंडा बिर्याणी | anda biryani recipe in marathi ची रेसिपी आवडली असेल , तर तुम्ही शेअर करा खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.

TIPS –  

1, फ्रेंड केलेला कांदा तयार करताना त्याला मीठ लावून व तो तळून घ्या मीठ लावल्याने कांदा व्यवस्थित फ्राईड होतो . 

2. बिर्याणी बनवायचे आधीच गव्हाचे किंवा ज्वारीची पिठाची कणीक बनवून घ्या . ती कणिक बिर्याणीच्या भांड्याला कडेने लावायला उपयोगी पडेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *