Home » Holi festival essay in marathi language| होळी निबंध

Holi festival essay in marathi language| होळी निबंध

Spread the love

नमस्कार मित्रानो आज आपण होळी वर निबंध लिहणार आहोत . होळी हा सर्वांचा आवडता सण आहे . लहान मुले होळी मध्ये खूप धमाल करतात.

त्यामुळे आज सर्वाना हा होळी निबंध लिहायला आवडणार आहे .

Essay on holi in marathi language| होळी वरती निबंध

होळी हा भारतातील एक महत्वपूर्ण व आनंददायी सण आहे. जो पूर्ण भारतात व नेपाळ मध्ये तसेच संपूर्ण जगामध्ये जिथे हिंदू लोक राहतात ते साजरे करतात . 

पूर्वी एक राजा होता हिरण्यकशप  हिरण्यकशप त्याला मुलगा होता प्रल्हाद तो विष्णू भक्त होता पण राजाला विष्णू भक्तीच राग होता .

राजाने प्रल्हाद ला विष्णू भक्ती करण्यापासून रोखले होते राजाला प्रल्हादाचा एवढा राग होता कि त्याने प्रल्हाद ला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण ते विफल जाहले .

शेवटी त्याने आपली बहीण होलिका ला प्रल्हाद बरोबरो अग्नी कुंडात बसवले पण होलिकेचा जाळून मृत्यू झाला पण प्रल्हाद वाचला तिथून होळी पर्वाची सुरवात झाली . 

होळी च्या आदल्या दिवशी  लहान मुले गावातील घरांमध्ये जाऊन लाकडे, शेण  कूट गोळा करतात व रानातून पालापाचोळा घेऊन येतात .

गुळाचा नैवेद्य केला जातो घरोघरी गोड पदार्थ केले जातात संध्याकाळी होलिका दहन केले जाते. मार्च महिन्यामध्ये जेव्हा पौर्णिमा च्या दिवशी होळीचा सण असतो होईल खड्डा खोदला जातो त्यामध्ये फांदी लावली जाते व होळीचा नारळ ठेवला जातो त्याच्याभोवती लाकडे  शेण कूट ठेवली जातात .

त्यानंतर होळी पेटवली जाते तसेच पहिला नैवेद्य दाखवला जातो दुसऱ्याविषयी होळीच्या राखेचे  लाडू केली जातात व ते लाडू एकमेकांना मारतात व त्यास धुळवड असे म्हणतात .

काही ठिकाणी होळी च्या पाचव्या दिवशी रंग खेळला जातो तर काही ठिकाणी होळीच्या दुसऱ्या दिवशी  खेळला जातो .

महाराष्ट्र मध्ये होळी च्या पाचव्या दिवशी रंग खेळला जातो. तसेच उत्तर भारतामध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळला जातो .या दिवशी लोक कटू भावना विसरतात व एकमेकांना रंग लावतात . गावो गवि रंग खेळाला जातो .

उत्तर भारतात या दिवशी भांग केली जाते व ती मोठ्या प्रमाणात सेवन केली जाते . 

या दिवशी लहान-मोठे वयोवृद्ध सर्व जण घेतात एकमेकावर फेकली जातात हा उत्सव रंगोत्सव म्हणून सर्वत्र मोठ्या प्रमाणात आनंदाने साजरा केला जातो .

जर तुम्हाला हा होळी निबंध आवडला असेल तर तुम्ही हा निबंध शेअर करा व खालील कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा .

दिवाळी ह्या सण वरील निबंध पाहण्यासाठी ह्या लिंक वर जावा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *