शेतकरी मनोगत निबंध in 2021|Best Shetkaryache Manogat Essay in Marathi 2021

Spread the love

शेतकरी मनोगत निबंध

नमस्कार विद्याथ्नो आज आपण शेतकऱ्याचे मनोगत ह्या विषयावर निबंध पाहणार आहोत . शाळेत शेतकऱ्यांवर  निबंध लिहायला सांगतात .आज आम्ही तुम्हाला जो निबंध देणार आहोत तो तुम्हाला खालील प्रश्नावरती सुद्धा उपयोगी ठरणार आहे . १. शेतकरी मनोगत निबंध २. shetkaryache manogat essay in marathi ३. shetkaryache manogat essay ४. shetkaryache manogat in marathi  5. .shetkaryacha atmakatha in marathi 6. shetkaryache atmavrutta in marathi 7. essay on shetkari in marathi 8. shetkari nibandh 

शेतकरी मनोगत निबंध
शेतकरी मनोगत निबंध

.Shetkaryache Manogat in Marathi Nibandh | मराठी निबंध शेतकरी चे मनोगत

सीमेवरती लढतो आमचा जय जवान मातीमध्ये कष्ट करतो जय किसान ….. अशी घोषणा लाल बहादूर शास्त्री नि केली होती व आमच्या डोक्यावरती मनाची पगडी बांधली होती . तोच शेतकरी मी आज तुमच्या समोर मनोगत मांडत आहे . 

एके काली सोन्याचा धूर निघत असलेला भारत देश कृषिप्रधान देश होता . मी शेतकरी आहे मी शेती करतो याचा अभिमान होता .

उत्तम शेती माध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असे मानले जायचे . पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे .

तरुण शेतकरी

आज तरुण पिढी शेती सोडून शहराकडे वळली आहे नोकरीच्या शोधात गावाकडून शहराकडे जाऊ लागली आहे गावेच्या गवे ओस पडू लागली आहेत याला जबाबदार  कोण आहे . 

अनियमित पाऊस कधी  जास्त कधी दुष्काळ यामुळे शेतीचे पूर्णपणे नुकसान होत आहे . ज्या वेळेस पाऊसाची गरज असते त्या वेळी तो कधी पडत नाही .

ज्या वेळी गरज नसते त्या वेळी मात्र भरपूर पडतो अगदी नकोस होतो . अशामुळे शेती बिनभरोशी झाली आहे . 

आम्ही सरकार कडे  मदतीसाठी बघतो पण सरकार कडे कुठे वेळ आहे आमच्याकडे बगायला . सरकारी शेतीच्या योजना ह्या नेत्यांचे बगलबच्चे व श्रीमंत शेतकरी घेतात आम्हा गरीब शेतकऱ्याकडे काय उरते .

कागद घेऊन नुसते हेलपाटे मारायचे तरी सुद्धा काहीच हाती लागत नाही.

योजना ह्या फक्त कागदावरती आम्हा शेतकऱ्याकडे कधी येतात हे देवालाच माहित . 

अशा परिस्थितीत कसे जगायचे आमच्या कुटुंबाचे पालन पोषण कसे करायचे . आम्ही आमच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र , निवारा या सुद्धा पूर्ण करता येत नाहीत .

देशाच्या पाठीचा कान असलेले आम्ही शेतकरी आमच्या कुटुंबाचा भर आम्हाला पेलवेना . 

कुटुंबाचे पालन पोषण करता यावे म्हणून आम्ही आधुनिक शेती ची कास धरली पण शेतीचे उत्पादन वाढवले .

उत्पादन वाढले पण शेतीला भाव मिळत नाही शेतीच्या मार्केट कमिटी व्यापाऱ्यांच्या हातात . दलाल व्यापारी शेतकऱ्याच्या जीवावरती मोठे झाले पण शेतकऱ्याचे खाण्याचे वांदे. 

शेतकरयांच्या जीवावर व्यापारी , खते विकणारा, शेतीमाल वाहतूक करणारा , बियाणे पुरवणाऱ्या कंपन्या , दलाल हे सर्व मोठे झाले पण शेतकरी कर्ज बाजरी झाला . 

आता तर अशी अवस्था झाली आहे की शेतकरी म्हणलं कि कोण मुलांना पोरी द्यायला तयार नाहीत . शेती करणाऱ्या मुलाचे लग्न रखडलेले आहेत . 

या सर्व कारणाने आमच्या पुढे आत्महत्या करणे हाच एक पर्याय उरला आहे . आम्ही सर्व बाजूने हताश झालो आहे .  

Leave a Comment